मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

  20

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप


नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात विजयी कामगिरी केल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम १५ वे स्थान मिळवले आहे. सामन्यात नऊ विकेट्स घेत सिराजने १२ स्थानांची झेप घेतली, ज्यामध्ये पाच विकेट्सचा समावेश होता. यामुळे भारताने रोमांचक सामन्यात यजमानांना सहा धावांनी पराभूत करून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.


शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची आवश्यकता असताना, चार विकेट्स शिल्लक असताना, 'सामनावीर' म्हणून निवडण्यात आलेल्या उत्साही सिराजने गस ॲटकिन्सनच्या शेवटच्या बादसह तीन फलंदाजांना बाद करून भारताला उल्लेखनीय विजय मिळवून दिला.


गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सिराजची आतापर्यंतची सर्वोत्तम आयसीसी क्रमवारी १६ व्या स्थानावर होती. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, ज्याने त्याच्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी तीन कसोटी खेळल्या, तो ८८९ गुणांसह क्रमवारीत अव्वलस्थानी आहे.


प्रसिद्ध कृष्णानेही कारकिर्दीतील सर्वोत्तम ५९ वे स्थान मिळवले, कारण तो सिराजसोबत एकाच कसोटीच्या दोन्ही डावात प्रत्येकी चार किंवा त्याहून अधिक बळी घेणारी दुसरी भारतीय जोडी बनली. याआधी फिरकी गोलंदाज बिशन बेदी आणि एरापल्ली प्रसन्ना यांनी दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज ॲटकिन्सन आणि जोश टंग यांनीही सामन्यात प्रत्येकी आठ बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. अॅटकिन्सन पहिल्यांदाच टॉप-१० मध्ये आहे, तर टंग १४ स्थानांनी पुढे जाऊन ४६ व्या स्थानावर आहे.


ओव्हल कसोटीतील शतकवीर यशस्वी जयस्वालने आठव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. आणि तो भारताचा नंबर १ कसोटी फलंदाज ठरला. यशस्वीने कारकीर्दितील सर्वाधिक ७९२ रेटींग गुण कमावले आहेत. इंग्लंडचा जो रुट व हॅरी ब्रूक हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. न्यूझीलंडचा केन विलियम्सन व ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हे यशस्वीच्या पुढे आहेत. ऋषभ पंतला एक स्थान खाली सकरून आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे, तर शुभमन गिल चार स्थान खाली घसरला आहे. तो १३ व्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला

WTC Points Tableमध्ये इंग्लंडला हरवून भारत तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप