Chiplun Crime : चिपळूणमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेची हत्या; CCTVची डीव्हीआरही गायब, पोलिस तपास सुरू

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय ६३) यांचा त्यांच्याच राहत्या घरी खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उघडकीस येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. सध्या खुनामागचं नेमकं कारण समजलेलं नसून, प्राथमिक स्वरूपाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात येत आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसुद्धा तपासले जात आहेत. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं असून, लवकरच आरोपीचा शोध घेऊन तपास पूर्ण केला जाईल, असं आश्वासन पोलिस प्रशासनाने दिलं आहे.




 

CCTV हार्ड डिस्क गायब


सेवानिवृत्त शिक्षिका आपल्या घरात विवस्त्र अवस्थेत मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी चिपळूणच्या सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे, घरात लावलेल्या CCTV कॅमेऱ्याची हार्ड डिस्क गायब असल्याचं समोर आलं आहे, ज्यामुळे हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक गडद होत आहे.
हल्लेखोरांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत कटपूर्वक हा गुन्हा केल्याचं स्पष्ट होत असून, आरोपींना ओळखणे व पकडणे हे चिपळूण पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरत आहे. या हत्येचं नेमकं कारण काय, याचा तपास सध्या सुरू आहे.

Comments
Add Comment

कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपनं खात उघडलं; रेखा चौधरींची बिनविरोध निवड

डोंबिवली: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल (३० डिसेंबर) शेवटची तारीख होती.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी

पुणे महानगरपालिकेत मोठमोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत असतानाच, कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे

जिथे तिथे घडले, बि-घडले

२९ महापालिकांतील लढतींचे चित्र स्पष्ट मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय युती

पत्र सर्वप्रथम 'प्रहारच्या' हाती: टेलिकॉम कंपन्यांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात एल्गार!

मोहित सोमण: सगळीकडे आपल्या दैनंदिन जीवनाचा श्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोनच्या बिलात वाढ होण्याची चर्चा सुरू

महाराष्ट्रातल्या प्रमुख महापालिकांतील चित्र काय ?

मुंबई : महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. या सर्व

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात