नारळी पौर्णिमेनिमित्ताने वाहतुकीत बदल

  29

ठाणे : कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते या काळात वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून साकेत, कळवा नाका भागात वाहतूक बदल केले आहेत.


ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील आगरी-कोळी समाज कळवा नाका येथे खाडी परिसरात एकत्र येतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी हे बदल केले आहेत. त्यासंदर्भाची अधिसूचना पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे.
असे असतील बदल :क्रिकनाका येथून उर्जिता उपाहारगृह मार्गे पोलीस मैदान, कोर्टनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना उर्जिका उपाहारगृह येथे प्रवेश बंदी असेल.


येथील वाहने क्रिकनाका, उर्जिता उपाहारगृह येथून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, जीपीओ मार्गे प्रवास करतील. साकेत मार्गे सिडकोच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना टीएमटी आणि एनएमएमटीच्या बसगाड्यांना राबोडी वाहतूक उपविभाग कार्यालय येथे प्रवेशबंदी असेल. ठाणे शहरातून कळवा उड्डाणपूलमार्गे नवी मुंबईत जाणाऱ्या खासगी, एसटी बसगाड्यांना कॅडबरी सिग्नल, गोल्डन डाईज नाका आणि खोपट सिग्नल येथे प्रवेशबंदी आहे.


ही वाहने पूर्व द्रुतगती मार्गावरून कॅडबरी सिग्नल येथून कोपरी पूल, मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे किंवा गोल्डन डाईज नाका, खारेगाव टोलनाका, पारसिक नाका मार्गे प्रवास करतील. गोल्डन डाईज नाका येथून जीपीओ मार्गे क्रिक नाका येथे वाहतूक करणाऱ्या चार चाकी, अवजड वाहने आणि मालवाहू वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने साकेत पूल, खारेगाव टोलनाका, पारसिक चौक मार्गे प्रवास करतील.


तसेच ही वाहने कॅडबरी जंक्शन , कोपरी, मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे देखील वाहतूक करू शकतात. हे वाहतूक बदल शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत लागू असतील. पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक वाहनांना ही अधिसूचना लागू नसेल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी १३२ कृत्रिम तलाव

ठाणे : उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्तींना परवानगी दिल्यामुळे पीओपी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मार्ग

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा चषकाचे अनावरण

भाईंदर : गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रो-गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ या

खाडी बुजवली, मासेमारी संपली…!

कोळी समाजाच्या उपजीविकेवर ‘विकासा’चे काळे वादळ ठाणे  : ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी

बदलापूरकरांवर पाणीकपातीचे संकट

बदलापूर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेअगोदर दाखल झाल्याने पाणीटंचाईचा सामना बदलापूरकरांना करावा

Eknath Shinde: ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश  ठाणे: ठाणे आणि परिसरातील वाहतूक

कल्याणमध्ये कोकण वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आमरण उपोषण

चौदा वर्षे उलटूनही बाधित सदनिकाधारकांची फरफट थांबेना कल्याण : सुमारे चौदा वर्षे उलटूनही कल्याण पश्चिमेतील कोकण