५०% टेरिफ झाले आता ट्रम्प यांची सेमीकंडक्टरवर मोठी धमकी!

मोहित सोमण: एकूण ५०% टेरिफ वाढीनंतर आता ट्रम्प यांनी नवी धमकी दिली आहे. अमेरिकेत उत्पादन न केल्यास सेमीकंडक्टर उत्पादनवरही १००% टेरिफ वाढ करणार असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी किती प्रमाणात कंपन्यांना सेमीकंडक्टर उत्पाद न वाढवावे लागेल याची कल्पना दिली नाही मात्र कंपन्यांनी आगामी काळात सेमीकंडक्टर उत्पादन अमेरिकेत न केल्यास सेमीकंडक्टरवर १००% टेरिफ लावू असे म्हटले आहे ज्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसू शकतो. कालही अखेर २४ तास पूर्ण होण्या पूर्वीच ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला होता. भारतावर २५% टेरिफ व्यतिरिक्त अतिरिक्त २५% टेरिफ जाहीर केला. ज्यावर भारताने ' अयोग्य, अन्यायकारक, अवास्तव ' अशी कठोर प्रतिक्रिया भारताने दिली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत व युएस टेरिफ संघर्ष आणखी वाढेल हे सर्वश्रुत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चे तेल, हत्यारे भारत खरेदी करत असल्याचा हवाला देत युक्रेन रशिया युद्धाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे खतपाणी घालत असल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. भारतानेही आम्ही राष्ट्रीय हितासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करू अशी प्रतिक्रिया भारताच्या सरकारच्या अधिकृत प्रवक्त्याने दिली आहे.


यापूर्वी सीएनबीसी टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी भारतावर आरोपांची राळ उडवून देत भारत रशियाला रसद पुरवत असल्याचे म्हटले होते. यामुळे आज व्हाईट हाऊसने हा निर्णय घेताना भारत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भारत रशियाकडून तेल खरेदी कर त आहे' असा निवाळा दिला. आणि अधिकृतपणे हा निर्णय जाहीर केला. ट्रम्प यांनी या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सह्या केल्या आहेत. त्यामुळे २१ दिवसांनंतर या निर्णयाचे कायद्यात रुपांतर होईल. आजपासून २१ दिवसाने हे नवीन टेरिफ दर लागू होतील. या टेरिफ चा सर्वाधिक फटका हिरे, ज्वेलरी, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल या उत्पादनावर बसणार आहे. मेटल व स्टीलवर यापूर्वीच ५० टक्के टेरिफ निश्चिती केली होती. मुलाखतीत ट्रम्प यांनी फार्मा उत्पादनावरही आगामी काळात टप्याटप्याने २५०% पर्यंत टेरिफ (Ta riff)  लादण्याचे जाहीर केले.


भारताकडून अमेरिकेला जेम्स ज्वेलरी, पेट्रोकेमिकल, खडे, हिरे, कपडे, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, मेटल, ऑरगॅनिक केमिकल्स, ऑटोमोबाईल अशा ढीगभर वस्तू निर्यात करतो. बाजारातील माहितीनुसार,ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताची निर्यात १.० ७ लाख कोटी, ज्वेलरीसाठी ०.९२ लाख कोटी, इलेक्ट्रॉनिक्स ०.७७ लाख कोटी, इंजिनिअरिंग उत्पादने ०.५२ लाख कोटी, तांबे, स्टील मेटल ०.२४ लाख कोटी, ऑरगॅनिक केमिकल्स ०.२२ लाख कोटी, फार्मा ०.८६ लाख कोटी, टेक्सटाईल ०.९२ लाख कोटी रुपये आहे. या उत्पादनावर आता जोरदार टेरिफ लागल्याने अमेरिकेतील या वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढणार आहेत. त्यामुळे निर्यातीवर यांचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय माहितीनुसार नवे टेरिफ दर ऑटोमोबाईल २३.०१%,टेक्सटाईल १० ते १२%, फार्मा ८.०६ %, इलेक्ट्रिक १८ टक्के, पेट्रो केमिकल्स ४ ते ८%, ऑरगॅनिक केमिकल्स ८.०६%, जेम्स ज्वेलरी ०.८%, स्टील मेटल ०.२४% आहे या टेरिफ मध्ये नवा बदल होणे अपेक्षित आहे.


भारत सरकारने या टेरिफवरील मनमानीवर कड्या शब्दात उत्तर दिले की,'अमेरिकेने अलिकडच्या काळात रशियाकडून भारताच्या तेल आयातीवर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही या मुद्द्यांवर आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे ज्यामध्ये आमची आयात बाजारपेठेच्या घटकांवर आधारित आहे आणि भारतातील १.४ अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या एकूण उद्देशाने केली जाते. म्हणूनच, इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क ला दण्याचा पर्याय निवडला आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्याय्य, अन्याय्य आणि अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल,' असे म्हटले.नेमके या शब्दात 'भारत सरकार सध्या रशियन फेडरेशनचे तेल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आयात करत आहे" असे ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशात म्हटले होते.


'त्यानुसार, आणि लागू कायद्यानुसार, अमेरिकेच्या सीमाशुल्क क्षेत्रात आयात केलेल्या भारतातील वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल' असे कार्यकारी आदेशात म्हटले आहे. या निर्णयाचे समर्थन करताना, ट्रम्प म्हणाले होते,'मला विविध वरिष्ठ अधि काऱ्यांकडून युक्रेनमधील परिस्थितीसंदर्भात रशियन फेडरेशनच्या सरकारच्या कृतींबद्दल अतिरिक्त माहिती मिळाली आहे. या अतिरिक्त माहितीचा विचार केल्यानंतर, इतर गोष्टींबरोबरच, मला असे आढळून आले आहे की कार्य कारी आदेश १४०६६ मध्ये वर्णन केलेली राष्ट्रीय आणीबाणी सुरूच आहे आणि रशियन फेडरेशनच्या सरकारच्या कृती आणि धोरणे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि परराष्ट्र धोरणाला असामान्य आणि असाधारण धोका निर्माण करत आहेत.' कार्यकारी आदेश १४०६६ मध्ये वर्णन केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी, मी ठरवतो की भारतातील वस्तूंच्या आयातीवर अतिरिक्त शुल्क आकारणे आवश्यक आणि योग्य आहे, जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रशियन फेडरेशनचे तेल आयात करते.' असे ट्रम्प यांनी म्हटले. तसेच ट्रम्प यांनी दिलेल्या आदे शापूर्वी औत्सुक्याचे वातावरण गुंतवणूकदारात होते ज्यावर शिक्कामोर्तब जागतिक पातळीवरील बिघाडीत मात्र वाढ झाली.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सूचित केले की कार्यकारी आदेशात सूडाची कारवाई किंवा परदेशी राष्ट्राच्या सहकार्याच्या आधारे बदल करता ये तील.


'जर एखाद्या परदेशी देशाने या कारवाईला प्रतिसाद म्हणून अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तर दिले तर, येथे दिलेल्या कारवाईची प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी मी या आदेशात बदल करू शकतो..जर रशियन फेडरेशनचे सरकार किंवा या आदेशामुळे प्रभावित झालेल्या परदेशी देशाने या आदेशाच्या कलम १ मध्ये वर्णन केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आणि राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक बाबींमध्ये अमेरिकेशी पुरेसे जुळवून घेतले तर मी या आदेशात आणखी बदल करू श कतो 'असे त्यांनी पुढे म्हटले.


रशियानेही अमेरिकेला यापूर्वी कड्या शब्दात सुनावत अमेरिका वसाहतवादी धोरण अवलंबत असल्याचा दावा केला होता. भारतानेही आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य देत पुढील आवश्यक पाऊस उचलू असे म्हटले होते. त्यामुळे भारताचे उच्चस्तरीय सदस्य यावर न वीन रणनीती आखत भारतीय उद्योगांना कमीत कमी नुकसान होण्यासाठी युद्धपातळीवर तयारीला लागले आहे. सरकारने रशियन तेलाचा संदर्भातही १४० कोटी नागरिकांच्या तेलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य ऑफर मिळेल तिथूनच तेल खरेदी करु असे म्हणत अमेरिकेला प्रतिआव्हान दिले होते. त्यामुळे पुढे काय घडणार हे जागतिक भूराजकीय परिस्थितीला नवे वळण देणे अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबईजवळ ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, १४ कोटींची ड्रग्स जप्त

वसई : वसईच्या पेल्हार येथे मुंबई पोलिसांच्या झोन सहामधील अँटीनार्कॉटिक्स सेल आणि टिळक नगर पोलिसांनी मिळून

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाल बदने आला शरण

सातारा (Satara Doctor Death) : सातारा जिल्ह्यातील फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या