११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर


नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा एकदा परतला आहे. या विषाणूचे नाव चिकनगुनिया आहे. गेल्या काही महिन्यांत चिकनगुनिया विषाणूला रियुनियन, मेयोट व मॉरिशस सारख्या बेटांवरून मादागास्कर, सोमालिया आणि केनियासारख्या आफ्रिकन देशांमध्ये पसरला आहे. आता तो चीनमध्ये वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गेल्या महिन्यात इशारा दिला होता की, चिकनगुनिया आशियाई देशांपासून ते युरोपपर्यंत कहर करू शकतो. सध्या आशिया व युरोपमधील अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण वाढत आहेत.


डब्ल्यूएचओने म्हटले होते की, सध्या ११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनिया संसर्गाचा धोका आहे. दरवर्षी केवळ चीनमध्येच नाही तर भारतातही चिकनगुनियाचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात डास वाढतात व चिकनगुनिया विषाणू अधिक पसरू लागतो. २००५ मध्ये चिकनगुनियाने साथीचे रूप धारण केले आणि नंतर हा आजार हिंद महासागरातील लहान बेटांपासून सुरू झाला आणि ५ लाखांहून अधिक लोकांमध्ये पसरला. क्वचित प्रसंगी, चिकनगुनिया अपंगत्व आणू शकतो.


चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात चिकनगुनिया विषाणूचा प्रकोप वाढत असून, जुलैपासून आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. डासांद्वारे पसरणाऱ्या या विषाणूमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे.


फोशान शहर सर्वाधिक प्रभावित असून, या ठिकाणी कोविड काळातील उपाययोजनांची आठवण करणारी पावले उचलली जात आहेत. फोशानमध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्येच ठेवले जात असून, त्यांच्यासाठी खास जाळी लावून डासांपासून संरक्षण केले जात आहे. रुग्णांना ८ दिवसांनंतर किंवा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज दिला जातो. चिकनगुनिया विषाणू संक्रमित डासांच्या चाव्याने पसरणारा आजार आहे.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय