एसटी महामंडळ यात्री अ‍ॅप चालवणार

मुंबई (प्रतिनिधी) : चालकाला सन्मानजनक मोबदला व प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री अ‍ॅप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या अ‍ॅग्रीगेटेड पॉलिसीच्या आधीन राहून यात्री अ‍ॅप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी बोलत होते. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.



छावा राईड'वर एकमत !


या अ‍ॅपला एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली. नवीन शासकीय अ‍ॅपला 'छावा राईड अ‍ॅप' हे नाव द्यावे असे ठरले असून मुख्यमंत्री फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांच्या मान्यतेने हे अॅप कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सरनाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी

मुंबई : राज्यात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार

प्रसिद्ध वेशभूषाकार दीपा मेहता यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध वेशभूषाकार (कॉस्ट्यूम डिझायनर) आणि नावाजलेले अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर

ब्लॅकमेल ऑपरेशन : जस्ट डायलद्वारे मसाज करायचंय, तर हे पहाच!

न्यूड व्हिडिओच्या धमकीने हायकोर्टाच्या वकिलाला ब्लॅकमेल करणारे भामटे गजाआड मुंबई : एका ६३ वर्षीय उच्च

मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली

मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा कोलमडली मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा एकदा

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन!

धरणांमध्ये ९९.१३ टक्के पाणीसाठा मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणीसाठा आता वाढत

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये

शिळफाटा आणि घणसोली दरम्यान ४.८८ किलोमीटर लांबीच्या बोगदा मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट