NSDL IPO लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी हिट 'या' प्रिमियम भावात शेअर लिस्टेड

मोहित सोमण: एनएसडीएल (NSDL) आयपीओला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिल्याने अखेर आज कंपनीचा शेअर सूचीबद्ध (Listed) झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार,कंपनीचा शेअर आपल्या मूळ किंमत असलेल्या प्राईज बँडपेक्षा १३.९८% म्हणजे च जवळपास १४% प्रिमियम दराने बाजारात विकला जात आहे. कंपनीने आयपीओसाठी प्राईज बँड (Price Band) ८०० रूपये प्रति शेअर निश्चित केला होता. आता तोच शेअर बाजारात ९१२ रूपयाने विकला जात आहे. त्यामुळेच कंपनीच्या शेअरला पहिल्या दि वशी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल आरओसीई (Return on Capital Employed ROCE) हे २३.६% वाढल्याने हा पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद मानावा लागेल. या व्यतिरिक्त शेअर्समध्ये आरओई (Return on Equity ROE) १७ .८% परतावा मिळाला आहे.



कंपनीला अखेरपर्यंत एकूण सरासरी ४१.०२ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. ज्यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Qualified Institutional Buyers QIB) यांच्याकडून सर्वाधिक १०३.९७ वेळा, त्यानंतर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Non I nstitutional Investors NII) ३४.९८ वेळा, किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors) ७.७६ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. तर कंपनीच्या (Depository) स्वतः चा कर्मचाऱ्यांक डून कंपनीला १५.३९ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले. सकाळी सूचीबद्ध झा ल्यानंतरच कंपनीच्या शेअर्समध्ये १०% पेक्षा अधिक वाढ झाली होती. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत इतके चांगले सबस्क्रिप्शन एनएसडीएल आयपीओला मिळाल्याने वित्तीय क्षेत्रातील गुंतवणूकदार आश्वस्त झाले आहेत.

२०१२ साली स्थापन झालेली एनएसडीएल ही देशातील सीडीएसएल (CDSL) सहभारतात सिक्युरिटीज डिपॉझिटरी म्हणून काम करते. सिक्युरिटीजच्या वाटप आणि मालकी हस्तांतरणाचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवते. तसेच डिमटेरियलायझेशन (Dematerialisat ion) ट्रेड सेटलमेंट,ऑफ-मार्केट ट्रान्सफर, सिक्युरिटीजचे प्लेजिंग (Pledging of Securities) आणि कॉर्पोरेट अँक्शन्ससह डिपॉझिटरी सेवा प्रदान करते.
Comments
Add Comment

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम

आतापर्यंत ६ कोटी लोकांनी ITR भरला आयकर विभाग म्हणाले, 'आतापर्यंत.....

प्रतिनिधी:कर निर्धारण वर्ष (Income Tax Assesment Year) २०२५-२६ साठी आतापर्यंत सहा कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे (ITR Filings) दाखल

Explainer- ITR भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस ! 'या' १५ चुका टाळल्यास तुमचा आयटीआर चुकणारच नाही

आयटीआर (Income Tax Returns) भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे एकप्रकारे करदात्यांना धाकधूक असते. त्यावेळी

प्रकाश महाजन यांनी दिला मनसेचा राजीनामा, पुढे काय करणार ?

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश

लग्नाच्या मुद्यावरुन लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना सुनावलं

बीड : लग्नाच्या मुद्यावरुन श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि