Paytm: रक्षाबंधनाकरिता पेटीएमचे गिफ्टिंग पर्याय

  25

रक्षाबंधनाकरिता पेटीएमचे गिफ्टिंग पर्याय

मुंबई: विश्वास आणि प्रेमाच्या नात्याचा सन्मान करत पारंपरिक भेटवस्तूंपलीकडे जात या रक्षाबंधनाला दीर्घकालीन मूल्य देणा-या भेटवस्तूंनी भावा-बहिणेचे प्रेमळ नाते साजरे करा. भारतातील पेमेंट्स आणि वित्तीय सेवा वितरक कंपनी पेटीएम बहिणींना आर्थिक सुरक्षा, संस्मरणीय अनुभव आणि दीर्घकालीन फायदे देणारे विविध पर्याय सादर करत आहे. यात वैयक्तिक संदेशासह यूपीआय ट्रान्सफर, गिफ्ट कार्ड्स, डिजिटल गोल्ड, प्रवासाची तिकीट बुक करा किंवा ट्रॅव्हल पास भेट, स्टेकॅशन किंवा व्हेकेशन भेट आणि आरोग्य विमा यांचा समावेश आहे. वैयक्तिक संदेशासह यूपीआय ट्रान्सफर: अंतर कितीही असो भेटीचं मूल्य कायम राहतं. यूपीआयद्वारे सुरक्षित व विश्वसनीयरीत्या त्वरित पैसे ट्रान्सफर करा. त्यात वैयक्तिक संदेश जोडल्यास गिफ्टिंग अनुभव अधिक अर्थपूर्ण आणि वेळेवर होतो.

गिफ्ट कार्ड्स: निवडीची मुभा: भेट देताना लवचिकता महत्त्वाची ठरते. गिफ्ट कार्ड्स प्राप्तकर्त्यांना नामांकित ब्रँड्स, फॅशन रिटेलर्स, फूड चेन आणि मनोरंजन प्लॅटफॉर्म्समधून निवड करण्याची मोकळीक देतात. हे एक सुलभ आणि सर्वसमा वेशक (Inclusive) पर्याय आहे.

डिजिटल गोल्ड खरेदी करा: भावना आणि दीर्घकालीन मूल्य यांचं संतुलन साधणारी भेट म्हणजे डिजिटल गोल्ड. केवळ ५१ रुपयांपासून सुरुवात करता येते. गुंतवणूक रोज, आठवड्यातून किंवा मासिक पद्धतीने करता येते. २४ कॅरेट सोनं सु रक्षितरित्या खरेदी, साठवणूक आणि विक्री करता येते. एक अशी अमूल्य भेट, जी भावंडांमधील नात्याची ताकद दर्शवते.

प्रवासाची तिकीट बुक करा किंवा ट्रॅव्हल पास भेट द्या: बहिणीला विश्रांती मिळावी म्हणून तिच्या फ्लाइट, ट्रेन किंवा बसची तिकीट बुक करा. अधिक लवचिकतेसाठी, डिजिटल ट्रॅव्हल व्हाउचर म्हणजे ट्रॅव्हल पास निवडा जी तिला तिच्या वेळेनु सार आणि इच्छेनुसार प्रवास करण्याची मुभा देतो. ट्रॅव्हल पासद्वारे १००० रुपयांपर्यंत सवलत मिळते आणि तो १ वर्षासाठी वैध असतो. यामध्ये कोणतेही कंव्हिनियन्स शुल्क नाही, त्यामुळे प्रवास अधिक सहज आणि खर्चिक दृष्टिकोनातून योग्य ठरतो.

स्टेकॅशन किंवा व्हेकेशन भेट द्या: पेटीएम अ‍ॅपद्वारे आरामदायी हॉटेल स्टे बुक करून बहिणीसाठी भेटीचा दर्जा वाढवा. मग ती एकटीने विश्रांती घेणं असो, मित्रांसोबतचा वीकेंड ट्रिप किंवा कुटुंबासोबत सुट्टी हॉटेल बुकिंग ही एक लक्षात राहणा री आणि पारंपरिक भेटींचा पर्याय ठरते.

आरोग्य विमा आणि दैनंदिन गरजा पूर्ण करा: तिच्या आरोग्याचे संरक्षण करा. ४९९ रुपयांपासून मासिक प्रीमियममध्ये मॅटर्निटी कव्हर, हेल्थ चेकअप्स, डॉक्टर ऑन कॉल सेवा व इतर सुविधा मिळतात. याशिवाय मोबाईल रिचार्ज,युटिलिटी बि ल पेमेंट्स किंवा ओटीटी सबस्क्रिप्शन रिन्यू करणे यांसारख्या गोष्टी तिच्यासाठी करा ह्या छोट्या कृतीही मोठ्या काळजीचे दर्शन घडवतात.
Comments
Add Comment

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या

चीनच्या सैन्यात रोबोटिक लांडग्याचा समावेश, मिनिटाला ६० गोळ्या झाडणार

बीजिंग : चीनच्या सैन्याने आपल्या भात्यात आता लांडग्याच्या रुपातील रोबो आणला आहे. मंगळवारीच चिनी सैन्याने या

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

Tata Motors: हॅरियर आणि सफारीचे ॲडव्‍हेंचर एक्‍स व्हेरिएंट लाँच

साहस, कार्यक्षमता आणि सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांचे परिपूर्ण पॅकेज मुंबई:टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या