धरालीचे प्राचीन शिवमंदिर ढगफुटीच्या तडाख्यात
उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला. अचानक ...
August 6, 2025 03:15 PM
उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला. अचानक ...
उत्तरकाशी : मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीत एक धक्कादायक घटना घडली. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला. अचानक ...
धराली गावात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीत ढिगाऱ्याखाली गेलेल्या ‘कल्प केदार’ मंदिराबाबत स्थानिकांमध्ये धार्मिक भावनांशी निगडित एक विशेष कथा प्रचलित आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, हे मंदिर अतिशय प्राचीन असून, त्याची वास्तुकला केदारनाथ धामप्रमाणेच आहे. याच कारणामुळे या मंदिराला ‘कल्प केदार’ असे नाव देण्यात आले आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, जसे केदारनाथ धाम हे मंदिर वर्षानुवर्षे बर्फाच्या थराखाली गाडले गेले होते, त्याचप्रमाणे कल्प केदार मंदिर देखील जमिनीखाली गाडले गेले होते. त्यानंतर काळानुसार या मंदिराचा काही भाग पुन्हा समोर आला आणि स्थानिकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले.
या पौराणिक संदर्भामुळेच, मंदिर ढिगाऱ्याखाली गेल्याने गावकरी अत्यंत भावनिक अवस्थेत आहेत. मंदिराबाबतचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन लक्षात घेता, अनेक भाविक पुन्हा एकदा या मंदिराच्या पुनरुत्थानाची आशा बाळगत आहेत.
धरालीतील ‘कल्प केदार’ मंदिराचा इतिहास १९४५ सालापासून उजेडात आला. माध्यमांतील वृत्तांनुसार, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात या मंदिरात पूजाअर्चा सुरू झाली होती, मात्र हे मंदिर पूर्णपणे उघड झालं ते १९४५ मध्ये. त्या काळात खीर गंगा नदीचा प्रवाह अचानक कमी झाला, आणि स्थानिकांना नदीकाठावर मंदिराच्या शिखरासारखी रचना दिसली. त्या जागेचं उत्खनन करण्यात आलं असता, अनेक फूट जमिनीतून प्राचीन शिवमंदिर बाहेर आलं. विशेष म्हणजे, या मंदिराची वास्तूरचना केदारनाथ मंदिराशी मिळती-जुळती होती. उत्खननानंतरही मंदिर जमिनीच्या पातळीखालीच राहिलं होतं. त्यामुळे भाविकांना मंदिरात खाली उतरून पूजा करावी लागत असे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार, खीरगंगेचं पाणी अनेकदा मंदिराच्या गर्भगृहात, थेट शिवलिंगापर्यंत पोहोचत असे, ही बाबही श्रद्धेचा विषय बनली होती. मात्र, आता ढगफुटीच्या घटनेमुळे, हे मंदिर पुन्हा एकदा मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये शोक आणि चिंता व्यक्त केली जात आहे. इतिहासात एकदा बाहेर आलेलं हे पवित्र मंदिर, आता पुन्हा जमिनीत दडपलं गेलं आहे.
धराली गावातील ‘कल्प केदार’ मंदिराचा उल्लेख इतिहासात तब्बल दोन शतकांपूर्वी सापडतो. १८१६ मध्ये गंगा-भागीरथीच्या उगमाचा शोध घेणारे इंग्रज प्रवासी जेम्स विल्यम फ्रेझर यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात धराली येथील मंदिरांमध्ये विश्रांती घेतल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर, १८६९ मध्ये इंग्रज छायाचित्रकार आणि संशोधक सॅम्युअल ब्राउन यांनी धरालीतील तीन प्राचीन मंदिरांचे छायाचित्रे काढली, जी सध्या भारतीय पुरातत्व विभागाकडे सुरक्षित आहेत. ही छायाचित्रे मंदिराच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा ठोस पुरावा मानली जातात. मंदिराच्या स्थापनेविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. काही लोक म्हणतात की, या शिवमंदिराची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली होती, तर काहींचा विश्वास आहे की, केदारनाथला येताना पांडवांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. या सर्व ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय संदर्भांमुळे, ‘कल्प केदार’ मंदिर हे फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
December 25, 2025 09:29 PM
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
December 25, 2025 07:56 PM
नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
December 25, 2025 06:23 PM
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
December 25, 2025 05:49 PM
अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
December 25, 2025 05:10 PM
कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन
देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
December 25, 2025 12:37 PM
नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी
All Rights Reserved View Non-AMP Version