वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या डॉक्टरचे नाव असून त्यांच्याकडे MG ZS EV टॉप मॉडेल कार आहे. डॉ. मिश्रा यांच्यासोबत झालेल्या प्रकारामुळे संपूर्णपण ऑटोमॅटीक असलेल्या ईव्ही एमजी कारच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


डॉक्टर मिथिलेश मिश्रा आणि त्यांची पत्नी त्यांच्या पूर्णपणे ऑटोमॅटिक MG Zm कारमधून बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या गाडीची सिस्टम अचानक फेल झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असा आरोप करण्यात येत आहे.हा प्रकार सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडला. डॉक्टर मिश्रा आपल्या बायकोसोबत बाहेर जेवायला निघाले होते. डॉ.मिश्रा हे गाडीत आपल्या पत्नीची वाट पाहत होते. त्यांची गाडी न्यूट्रलवर होती आणि हँडब्रेकही लावलेला होता. पत्नी गाडीत बसल्यानंतर गाडी ड्रायव्हिंग मोडवर टाकण्यासाठी ब्रेक रिलीज होत नव्हता. मिश्रा यांनी बराचवेळ ब्रेक काढण्यासाठी प्रयत्न केला.सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून काही सेकंद ही गाडी जागीच उभी असल्याचे दिसून आले आहे. मिश्रा यांनी सांगितले की गाडीचा ब्रेक आपोआप निघाला आणि गाडीने प्रचंड वेग घेतला. गाडी थेट इमारतीच्या भिंतीवर आदळली आणि जागीच उलटली.



ही कार भिंतीला धडकत असताना गाडीच्या समोरून एक तरुण जात होता. मिश्रा यांची अनियंत्रित झालेली कार या तरुणाला चिरडू शकली असती. मिश्रा यांनी सांगितले की स्टेअरींग डावीकडे वळवल्याने त्या तरुणाचा जीव वाचला. मात्र कार भिंतीला धडकून उलटली आणि मिश्रा दाम्पत्य आतच अडकले होते. गाडी इतक्या वेगाने धडकल्यानंतरही एकही एअरबॅग उघडली नाही आणि दरवाजेही उघडले नाहीत, ज्यामुळे डॉक्टर दांपत्य गाडीत काही काळ अडकले. स्थानिक रहिवाशांनी गाडीचे सनरूफ तोडून त्यांना बाहेर काढले. या अपघातात कोणीही जबर जखमी झाले नाही.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे का? येथे शोधा...

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या आणि नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

TCS Q2 Results: जागतिक अस्थिरतेही Tata Consultancy Services आर्थिक निकाल सकारात्मक कंपनीच्या एकत्रित नफ्यात 'इतक्याने' वाढ

प्रतिनिधी:देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने (Tata Consultancy Services Limited) आपला आर्थिक वर्ष २०२६ दुसरा तिमाही निकाल जाहीर

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Stock Market Marathi News: मेटल, फार्मा, आयटी, हेल्थकेअर शेअरसह मिडकॅप व लार्जकॅप शेअर्समध्ये उसळी 'या' कारणामुळे सेन्सेक्स ३९८.४४ व निफ्टी १३५.६५ अंकाने उसळला!

मोहित सोमण: मिडकॅप व लार्जकॅपमध्ये झालेल्या रॅलीमुळे आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. विशेषतः मेटल, फार्मा, आयटी,