Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला जातोय, असा गंभीर आरोप करत, ‘खालिद का शिवाजी’ या वादग्रस्त चित्रपटावर हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी करत हिंदू महासंघासह अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. या वादामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.



सेन्सॉर बोर्डाला पत्र


हिंदू महासंघाने 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत थेट सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवलं आहे. यासोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनाही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. चित्रपटाच्या कथेतून शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहे आणि त्यातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. अशा प्रकारे इतिहास चुकीचा दाखवल्यास समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असंही या संघटनांचं म्हणणं आहे.





मुंबई पोलिसांनी घेतली दखल!


या चित्रपटाविरोधात 'सकल हिंदू समाज' या हिंदुत्ववादी संघटनेने ऑनलाइन आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. मुंबई पोलिसांनी या संघटनेच्या सदस्यांना सार्वजनिक शांततेत बाधा आणू नये, अशी एक औपचारिक नोटीस जारी केली. या चित्रपटामुळे समाजात अशांतता निर्माण होऊ शकते, अशी पोलिसांना भीती आहे.



प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलंय?





  • या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान सैनिक होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुसलमान होते, तसेच रायगडावर महाराजांनी मशीद बांधली होती, असे आक्षेपार्ह आणि विकृत दावे करण्यात आले आहेत. हे सर्व दावे भ्रामक, अप्रामाणिक आणि कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यांविना प्रसारित करण्यात आले आहेत.

  • छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी धर्मनिष्ठ हिंदवी स्वराज्य उभारले. त्यांनी स्वतः त्यांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे, ‘तुर्क फौजेत ठेविले, मग जय कैसा होईल ?’

  • चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही धार्मिक जनगणना नव्हती. अशा परिस्थितीत ३५ टक्के मुसलमान सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जात आहे?

  • जर मुसलमान समाजाला खरंच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम असते, तर पाच मुसलमान पातशाह्यांनी त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला नसता किंवा छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले नसते. सध्याच्या काळातही जर मुसलमान समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदर असता, तर यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथे झालेल्या हिंसाचारात ‘सय्यद’ नावाच्या धर्मांधाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली नसती. त्यामुळे ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट हिंदु समाजात भ्रम निर्माण करणारा आणि शिवाजी महाराजांचे खोटे चित्रण करणारा आहे.

  • भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(२) आणि भारतीय दंड संहिता कलम २९५ (अ) नुसार ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे विकृत चित्रण जनतेच्या धार्मिक भावना दुखावणारे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणारे ठरू शकते. पूर्वीही ‘पद्मावत’, ‘जोधा अकबर’ या चित्रपटांच्या वेळी अशा विकृत इतिहासामुळे जनक्षोभ निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही, तोपर्यंत बंदी घालण्यात यावी.


Comments
Add Comment

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या