कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद


मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी बंधनकारक


मुंबई (प्रतिनिधी) : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर 'डीजी अ‍ॅप'वर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. 'डीजी अ‍ॅप'वर नोंदणी असणाऱ्या अभ्यागतांनाच आता मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.


कामानिमित्त राज्यभरातील लोक मंत्रालयात धाव घेतात. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी अभ्यागतांसह वकील, राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना गार्डन गेटजवळील खिडकीवर ऑफलाइन पास काढणे बंधनकारक आहे. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी गार्डन गेट जवळ ऑफलाइन पाससाठी ९ खिडक्या, तर नवीन प्रशासकीय इमारतीत १ खिडकी अशा एकूण १० खिडक्यांवर ऑफलाइन पास उपलब्ध होतो. मात्र मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने १५ ऑगस्टपासून खिडक्यांवर ऑफलाइन पास देणे बंद करण्यात येणार आहे.


मंत्रालयात येणाऱ्या व्हीव्हीआयपीची सुरक्षा व गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्च २०२५ मध्ये फेस डिटेक्शन व 'डीजी अ‍ॅप' प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे आता ऑफलाइन पास पद्धत बंद करण्यात येणार असून अभ्यागतांना आता 'डीजी अ‍ॅप' वरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे, असे गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले.


कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने फेस डिटेक्शन व डीजी प्रवेश अ‍ॅप प्रणाली अमलात आणली. या दोन्ही प्रणालीमुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचे निकम यांनी सांगितले.



असा डाऊनलोड करा 'डीजी अ‍ॅप'


डीजी प्रवेश अ‍ॅप हे मोबाइल अ‍ॅप अण्ड्राईड आणि आयओएस अ‍ॅप या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाइलच्या प्रणालीनुसार अँड्राईडमध्ये प्ले स्टोअरवर, तर आयओएस अ‍ॅपल स्टोअरवर डीजी प्रवेश (digi pravesh) हे सर्च केल्यास हे अ‍ॅप विनामूल्य डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपवर सुरुवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश मिळतो.

Comments
Add Comment

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे

बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई  : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता