शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

  82

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक आशिष भाऊसाहेब शिंदे यांचा मृतदेह अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरातील स्वराज्य फॅमिली रेस्टॉरंट अ‍ॅण्ड लॉजमधील खोलीत आढळून आला.


हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूम सर्व्हिससाठी दरवाजा अनेक वेळा ठोठावला, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापकांनी संशय व्यक्त करत दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडताच खोलीत आशिष शिंदे हे पंख्याला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळले.



घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


या प्रकरणात अर्धापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे. शिक्षकांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ