मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

  21

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित नागरिकाने ते कासव वन विभागाकडे सुपूर्द केले. सध्या हे कासव रेस्क्यूइंग असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ (रॉ) या संस्थेकडे असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.


संस्थेने कासवाची वैद्यकीय तपासणी केली असून प्राथमिक अहवालानुसार कासवाच्या कवचाला इजा झाली आहे. अपुरा आहार, दूषित पाणी यामुळे कासवाची प्रकृती बिघडल्याचे रॉचे संचालक पवन शर्मा यांनी सांगितले.


तसेच अयोग्य ठिकाणी ठेवल्यामुळे आणि योग्य पद्धतीने संगोपन न केल्यामुळे कासवाची प्रकृती बिघडल्याचे त्यांनी सांगितले. ल्युसिस्टिक आजार अानुवंशिक आहे. त्यामुळे शरीरातील रंगद्रव्य कमी होऊन त्वचेचा रंग पांढरा किंवा ठिकठिकाणी फिकट दिसतो. प्राण्याच्या त्वचेत, केस, पिसांमध्ये किंवा कवचामध्ये रंगद्रव्यांचे प्रमाण कमी होते. अल्बिनिझमप्रमाणे संपूर्ण रंगद्रव्याचा अभाव नसतो.


विशेष म्हणजे ल्युसिस्टिक प्रजातीतील प्राण्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत नाही, अल्बिनिझममध्ये प्राण्याचे डोळे सामान्यत: गुलाबी किंवा लालसर दिसतात. हे दुर्मीळ कासव अाता वनविभागाच्या स्वाधीन केले आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :