रक्षाबंधन २०२५: तारीख आणि शुभ मुहूर्त
रक्षाबंधन तारीख: शनिवार, ९ ऑगस्ट २०२५
श्रावण पौर्णिमा तिथी प्रारंभ: ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी.
श्रावण पौर्णिमा तिथी समाप्त: ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी.
उदया तिथीनुसार: ९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन साजरे केले जाईल.
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त (९ ऑगस्ट २०२५, शनिवार):
सकाळचा शुभ मुहूर्त: सकाळी ०५:३५ ते दुपारी ०१:२४ पर्यंत.
या वेळेत ब्रह्म मुहूर्त (पहाटे ०४:२२ ते ०५:०४) आणि अभिजीत मुहूर्त (दुपारी १२:१७ ते १२:५३) देखील समाविष्ट आहेत, जे अत्यंत शुभ मानले जातात.
राहुकाळात राखी बांधणे टाळा
ज्योतिषशास्त्रानुसार, राहुकाळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे असे मानले जाते. या काळात केलेली कामे पूर्णत्वास जात नाहीत किंवा त्यांचे नकारात्मक परिणाम दिसून येतात, अशी धार्मिक मान्यता आहे.या वेळेत राखी बांधणे टाळावे. शुभ मुहूर्तावरच बहिणींनी आपल्या भावांना राखी बांधावी, असे ज्योतिष तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भद्रा काळाबद्दल
यावर्षी रक्षाबंधनावर भद्राचा साया नसणार आहे. भद्रा काळ ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल आणि ९ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजून ५२ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे सकाळी राखी बांधण्याच्या वेळेस भद्राचा अडथळा नसेल.