शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश


मुंबई (प्रतिनिधी) : सन २०२५ वर्ष हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जयंतीचे वर्ष आहे. यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर माउलींचा पसायदानाच्या माध्यमातून दिलेला विचार राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये एकाच वेळी पोहोचावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार येत्या १४ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत पसायदानाचे पठण करण्यात यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना दिले आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी पुणे येथील शिक्षण विभागाचे आयुक्त यांना यासंदर्भात फळविले आहे.


शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून हे आदेश राज्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित, खासगी, महापालिका, जिल्हा परिषद,संस्थात्मक शाळांना कळविण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट रोजी गोकुळ अष्टमीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माठली यांची ७५० वी जयंती आहे. या दिवशी १५ ऑगस्टनिमित्त झेंडावंदन, प्रभातफेरीचे कार्यक्रम शाळांमध्ये असल्याने पसायदान पठणाचा कार्यक्रम १४ ऑगस्ट रोजी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश आहेत. हे आदेश प्राप्त होताच राज्यातील १५ शाळांनी ऑगस्टच्या झेंडावंदनाच्या तयारी बरोबर पसायदान सामूहिक पठणाची जोरदार तयारी शाळांमध्ये सुरू केली आहे. काही यासंदभांत आम्हाला अद्याप आदेश प्राप्त नाहीत. पण आदेश प्राप्त होताच शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन केले जाईल असे सांगितले.


तर, बहुतांशी शाळा संस्था संस्थापकांनी आम्ही आमच्या शाळेत नियमित पसायदान, मनाचे श्लोक, संस्कृतीशी निगडित मुलांवर संस्कार करणाऱ्या प्रार्थना, राष्ट्रभक्तीपर गीतांचे सामुदायिक पठण करत असतो असे सांगितले, १४ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम पार पाडू असे सांगितले. पसायदानातून संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाचा विचार मांडला आहे.


हा विचार शालेय जीवनापासून विद्याथ्यांना कळाया हाही या उपक्रमा मागील उद्देश असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै रोजी राज्यातील शाळांमध्ये पसायदानाचे पठण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी ३१ जुलै रोजी शालेय शिक्षण आयुक्तांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.


मागील दोन महिन्यांपासून राज्यांमधील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीच्या विषपावरून जोरदार राजकीय घमासान सुरू होते. या हिंदी सक्तीच्या विषयावरून उलटसुलट आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे राज्य सरकारला हिंदी सक्तीचा विषय रद्द करावा लागला होता. यावरून विरोधकांनी जल्लोष केला होता.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील