मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल उचललं असून, IT क्षेत्रातील आघाडीची कंपनी LTIMindtree ला हा प्रकल्प दिला आहे. नव्या प्रणालीसाठीचा करार ७९२ कोटी रुपयांहून अधिक रकमेवर मंजूर करण्यात आला आहे.



खरंतर पॅन कार्ड आता केवळ ओळखपत्र राहिलेले नाही, तर ते एक प्रगत डिजिटल साधन बनलं आहे. सरकारकडून आता पॅन २.० सादर केले गेलं आहे. जे पेपरलेस प्रक्रिया, युनिफाइड पोर्टल आणि डायनॅमिक क्यूआरकोड सारख्या आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. तर पॅन २.० जरी सरकारने आणलं असलं तरी विद्यमान पॅनकार्ड धारकांना घाबरण्याचे काहीही कारण नाही. कारण, त्यांचे कार्ड अजूनही पूर्णपणे वैध आहे.




काय आहे ‘PAN २.०’?


PAN २.० हे स्थायी खाते क्रमांक (PAN) आणि कर वजावट व संकलन खाते क्रमांक (TAN) शी संबंधित सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारं डिजिटल पोर्टल असेल. यामध्ये PAN वाटप, सुधारणा, आधार-पॅन लिंकिंग, पुन्हा इश्यू करणे, आणि ऑनलाइन पडताळणी अशा सर्व सेवा असणार आहेत.



नोव्हेंबर २०२४ मध्ये अर्थ मंत्रालयाने पॅन २.० सुरू केले. करदात्यांना चांगल्या, जलद आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करण्याच्या यामागे उद्देश होता. हा उपक्रम भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या अंतर्गत, आता पॅनशी संबंधित सर्व सेवा एकाच युनिफाइड पोर्टलवर उपलब्ध असतील आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि पेपरलेस असणार आहे. २०१७ पासून पॅन कार्डमध्ये क्यूआर कोड देण्यात येत आहे, परंतु पॅन २.० मध्ये हा क्यूआर कोड आता डायनामिक बनला आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही हा क्यूआरकोड स्कॅन करता तेव्हा तो रिअल टाइममध्ये अपडेटेड माहिती दाखवेल. यामुळे कार्डची वैधता तपासणे, ओळख पडताळणे आणि फसवणूक रोखणे सोपे होणार आहे.




जुने पॅन कार्ड देखील पॅन २.० अंतर्गत पूर्णपणे वैध राहणार


सरकारने स्पष्ट केले आहे की जुने पॅन कार्ड देखील पॅन २.० अंतर्गत पूर्णपणे वैध राहणार. २०१७ पूर्वी कार्ड असलेल्या लोकांकडे क्यूआर कोड नाही, परंतु त्यांना हवे असल्यास ते नवीन कार्ड मिळवू शकतात. तथापि, हे अनिवार्य नाही. पॅन २.० सोबत आता मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता, नाव आणि जन्मतारीख यासारखे तपशील आता सहज आणि मोफत अपडेट करता येतील. आधारशी लिंक केल्यामुळे ही प्रक्रिया आधीच सोपी होती, परंतु आता ती अधिक सोयीस्कर करण्यात आली आहे. याशिवाय, एका विशेष QR रीडर अ‍ॅपद्वारे QR कोड स्कॅन करून व्यक्तीची पडताळणीही करता येते.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला