कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

  21

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या १६ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार आहे. त्यानंतर कोल्हापुरात सीपीआर समोरील इमारतीमध्ये १८ ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.


पक्षकार, वकिलांपासून ते सर्वसामान्य ते राजकीय नेत्यांनी गेल्या ४२ वर्षांपासून दिलेल्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचची घोषणा करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी गेल्या साडेचार दशकांपासून लढा सुरू आहे. खंडपीठाची पहिली पायरी सर्किट बेंचच्या माध्यमातून झाली आहे.


त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्यांच्या मुंबईमधील चकरा पूर्णतः थांबणार आहेत. दरम्यान, सर्किट बेंचसाठी पहिल्या टप्प्यांमध्ये चार ते पाच न्यायमूर्तींची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चार न्यायमूर्तींचे कामकाज चालण्याची व्यवस्था सीपीआरसमोर कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे.


याशिवाय प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन प्रमुख आणि किमान ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल अशी शक्यता बार असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या कोल्हापूर शहरात शेंडा पार्कमध्ये खंडपीठासाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे.
खंडपीठासह निवासस्थाने सुद्धा यामध्ये प्रस्तावित आहेत. त्यामुळे जागा अंतिम झाल्यानंतर पुढील चार ते पाच वर्षात खंडपीठाची स्वत:ची वास्तू असणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :