हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता


अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील हुंडा व एकूणच लग्नसमारंभातील वाढता दिखावा आणि लग्नातील अनाठायी खर्चावर समाजातील लोकांकडूनच बोट ठेवले गेले. अहिल्यानगरमधील मराठा समाजाने अत्यंत पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला. तसेच लग्नातल्या बडेजावाला काट मारणारी एक आचारसंहिताच जाहीर केली आहे.


या आचारसंहितेच्या प्रसार व प्रचारासाठी लग्न सोहळे साधे सुसंस्कारित आणि हुंडामुक्त व्हावेत यासाठी अहिल्यानगर येथे मराठा लग्न आचारसंहिता संमेलन २०२५ भरवण्यात आले.


हुंड्याऐवजी मुलीच्या नावाने मुदत ठेव, प्री-वेडिंगचा व्हिडिओ जर लग्नात स्क्रीनवर दाखवला तर उठून जावे, डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वापरावीत, लग्न सोहळा १०० ते २०० लोकांमध्ये करावा अशा अनेक मुद्दे या संमेलनात मांडण्यात आले. या संमेलनाला ह.भ.प. भास्करगिरी महाराज, ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना