फेडरल बँक बनली चौथ्या क्रमांकाची खाजगी बँक 'असा' आहे निकाल

मोहित सोमण: तिमाही निकालासह फेडरल बँक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या निकालात बँकेच्या निव्वळ नफा (Net Profit) ८६१.७५ कोटींवर पोहोचला आहे जो मागील तिमाहीतील १००९.५३ कोटीवरून घसरण या तिमाहीत ८६१.७५ कोटींवर गेला. ज्यामध्ये यंदा १४.६% नफ्यात घसरण झाली. तसेच बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर मागील वर्षाच्या तिमाहीतील २२९१.९८ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत उत्पन्न २३३६.८३ कोटींवर पोहोचले आहे. बँकेच्या इतर उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) मागील वर्षाच्या तुलनेत २१.६१% वाढत १११३ कोटींवर गेले आहे.

बँकेच्या माहितीनुसार, निव्वळ अँडव्हान्स (Net Advance) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ९.२४% वाढ झाली. याव्यतिरिक्त बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत ८.०३% वाढ झाली. तर सीआरएआर (Capital to Risk Asset Ratio CRAR) या तिमाहीत १६.०३% वर कायम आहे. बँकेच्या माहितीनुसार, बँकेच्या जीएनपीए (Gross Non Performing Assets GNPA) व निव्वळ एनपीए (Net Non Performing Assets NNPA) अनुक्रमे १.९१%,०.४८% असल्याचे बँकेने स्प ष्ट केले आहे.

बँकेच्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली. मागील वर्षाच्या १५००.९१ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १५५६.१९ कोटींवर ऑपरेटिंग नफा गेला होता. बँकेच्या ए कूण व्यवसायात इयर ऑन इयर बेसिसवर ९% वाढ झाली ज्यामध्ये मागील तिमाहीतील ४८६८७१.३३ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत वाढ होत ५२८६४०.६५ कोटींवर गेले आहे. बँकेच्या एकूण उत्पन्नात (Total Income) मध्ये मागील तिमाहीतील ७२४६.०६ को टींच्या तुलनेत ८% वाढत यंदा तिमाहीत ७७९९.६१ कोटीवर वाढले आहे. चांगल्या निकालानंतरही मात्र घसरलेल्या नफ्यामुळे बँकेच्या शेअर्समध्ये सकाळी ४ ते ५% पर्यंत घसरण झाली होती. दुपारी २ वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये परिस्थिती सुधारत ०.३२% वाढ झाली आहे.

मालमत्तेच्या बाबतीत, मागील तिमाहीतील निव्वळ कर्ज (Net Loan) २२०८०६.६४ कोटी रुपयांवरून वाढून या तिमाहीत रोजी २४१२०४.३४ कोटी झाले आहे म्हणजेच ९% पेक्षा जास्त वाढ यामध्ये झाली आहे. रिटेल कर्ज १५.६४% वाढून ८१०४६.५४ कोटी रुपयां वर पोहोचले. आकडेवारीनुसार, व्यवसायिक बँकिंग कर्ज ६.२९% वाढून १९१९३.९५ कोटी रुपयांवर पोहोचले. कमर्शियल बँकिंग कर्ज ३०.२८% वाढून २५०२८ कोटी रुपयांवर पोहोचले. कॉर्पोरेट कर्ज ४.४७% वाढून ८३६८०.४४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सीव्ही (CV)/सीई (CE) कर्ज ३०.३१% वाढून ४८५८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

याबद्दल बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले होते की मे महिन्यात मायक्रोफायनान्स पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक ताण आला होता आणि तेव्हापासून परिस्थिती सुधारत आहे. या ताणामुळे, क्रेडिट खर्च मागील तिमाहीच्या तुलनेत ३८ बेसिस पॉइंट्सने वाढून ६५ बेसिस पॉइंट्सवर पोहोचला. तथापि, व्यवस्थापनाला अपेक्षा आहे की हे कमी होईल आणि वर्षाचा शेवट ५५ बेसिस पॉइंट्सवर होईल'.

निकालाविषयी बोलताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीएस मनियन म्हणाले आहेत की,'या तिमाहीने आमच्या वैविध्यपूर्ण मॉडेलची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. सामान्यतः मऊ असलेल्या पहिल्या तिमाहीतही, आम्हाला व्यावसायिक बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि सुवर्ण कर्जे यासारख्या प्रमुख विभागांमध्ये गती दिसली. आमचे मध्यम उत्पन्न देणारे इंजिन देखील चांगले काम करत आहेत. आम्ही उत्पादकता सुधारण्यासह मजबूत ऑपरेटिंग कामगिरी दिली. शुल्क उत्पन्नाने विक्रमी उ च्चांक गाठला आणि कासा (CASA) गुणोत्तरांमध्ये सातत्याने सुधारणा होत राहिली. मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत, या तिमाहीत क्रेडिट खर्च वाढला असला तरी, ते मुख्यत्वे कृषी आणि एमएफआय पोर्टफोलिओमधील घसरणीमुळे होते. सध्याच्या ट्रेंडच्या आधा रे, आम्हाला अपेक्षा आहे की हे घसरणे पुढे मध्यम आणि स्थिर होईल, ज्यामुळे क्रेडिट खर्च सामान्य होईल. मॅक्रो टेलविंड्सची निर्मिती आणि आमच्या धोरणात्मक थीम्सना गती मिळत असल्याने, जोखीम आणि नफ्यावर शिस्तबद्ध राहून दुसऱ्या सहामाहीत वाढी ला गती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.'
Comments
Add Comment

आता असूचीबद्ध शेअर सेबी रडारवर? पांडे यांचे मोठे विधान

सेबी सूचीबद्ध नसलेल्या शेअर बाजाराचे नियमन करण्यावर विचार करू शकते- तुहिन कांता पांडे प्रतिनिधी: सध्या

Nitesh Rane : हाहाहा, हीहीही..."उद्धवजी आणि पेग्विनला"; जय श्रीराम!"... नितेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

मुंबईत महायुतीची मुसंडी पाहताच भाजपचा प्रहार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत महायुतीने (भाजप-शिंदे गट)

WPI Inflation: घाऊक ग्राहक किंमत महागाईत डिसेंबरमध्ये किरकोळ वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण: प्राथमिक उत्पादन खर्चात वाढ झाल्याने यंदा घाऊक ग्राहक किंमती निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ०.८६%

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

BMC Election Result 2026 : मुंबईत 'महायुती'चा झंझावात! भाजप-शिंदे गटाने गाठलं 'शतक'; महापालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या