Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश 

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अवैध बांधकामविरुद्ध मोहीम पुन्हा सुरू केली आहे. आज दिल्ली गेट ते हर्सल टी पॉईंटपर्यंत ही धडक कारवाई करण्यात आली, यासाठी १५ जेसीबी, चार कोकलेन, पंधरा टिप्पर आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईला काही दुकानदारांनी सुरुवातीला विरोध केला खरा, परंतु कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर ते स्वतःहून अतिक्रमण काढण्यास तयार झाले.

सांभाजीनगरमध्ये दिवसागणिक वाढत चाललेल्या अवैध बांधकामाला अंकुश घालण्यासाठी आणि अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने  कठोर भूमिका घेतली असून, "अतिक्रमण काढत नसल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा," असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

अतिक्रमण संबंधित खंडपीठाने अनेक याचिका फेटाळून लावल्या असून, अवैध बांधकाम तोंडण्यासाठी नोटीस देण्याची गरज नसल्याचेही म्हटले आहे. ज्यांची अधिकृत घरे रस्त्यात येत आहेत, त्यांना महानगरपालिकेकडून टीडीआर दिला जाणार आहे. तर व्यावसायिक बांधकामे हटवली जात आहेत.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये