मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

  38

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक दिल्यामुळे मूळ देवगड फणसगाव आणि सध्या रा. ओरोस वर्दे रोड येथील मोपेडवर मागे बसलेल्या सौ शमिका शशांक पवार वय २७ या जागीच ठार झाल्या. तर मोपेड चालक शशांक प्रकाश पवार वय ४० त्यांचे चार महिन्याचे बाळ कु. पवित्रा व साडेतीन वर्षाच्या प्रभास हा सुदैवाने बचावला. हा अपघात सोमवारी साडेबाराच्या दरम्यान झाला. घटनास्थळी तात्काळ ओरोस पोलीस, महामार्ग पोलीस व कसालचे सरपंच राजन परब पोहचले. जखमीना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.


गोव्याकडून आलेली एट्रिगा कार (एमपी ०९ झेडव्हाय ६९७५) मुंबईच्या दिशेने जात असताना कणकवलीच्या दिशेने जाणारे शशांक पवार यांनी महामार्गावर विरोधी दिशेकडील दुसऱ्या लेन कडे जाण्याचा आकस्मिक प्रयत्न केला. त्यामुळे या कारची धडक पवार यांच्या (एमएच ०७ एव्ही १२२९) या अपंगांच्या चार चाकी सुझुकी एक्सेस मोपेडला बसली. मोपेड च्या मागे असलेल्या शशांक पवार यांच्या पत्नी शमिका पवार या धडकेत रस्त्यावर जोरदार आपटल्या. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. तर मोपेड स्वार शशांक पवार व मयत झालेल्या शमिका पवार यांच्या हातात असलेली चार महिन्यांची पवित्रा व मध्ये बसलेला साडेतीन वर्षाचा त्यांचा मुलगा प्रभास हा सुदैवाने बचावला.


याप्रकरणी ईरटीका गाडीचा चालक राहुल शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अपघात वृत्त समजतात घटनास्थळी मार्ग महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने दाखल झाले. ए एस आय प्रकाश गवस, नंदू गोसावी, रवी इंगळे, सागर परब ओरोस पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भुतेलो, गोसावी दाखल झाले. अपघात स्थळी नागरिकांनी ही मदत कार्य केले.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे