नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी रविवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८:४६ वाजता देण्यात आली. धमकीच्या फोननंतर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपीला ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश विष्णु राऊत (राहणार तुलसीबाग रोड, महल, नागपूर) या संशयिताने गडकरींच्या घराला बॉम्बने उडवण्याचा फोन केला होता. तो मेडिकल चौकाजवळील एका देशी दारूच्या दुकानात काम करत होता. त्याने स्वतःच्या मोबाईलवरून कॉल करून १० मिनिटांत गडकरींचे घर उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी बीमा रुग्णालयाजवळून त्याला ताब्यात घेतले. धमकीच्या कॉलनंतर पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्याला आणि बॉम्ब शोध पथकाला तत्काळ माहिती दिली. गडकरी यांच्या निवासस्थानी कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नाही. त्यामुळे हा कॉल खोटा असल्याचे स्पष्ट झाले. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात यापूर्वी अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते. त्यानंतर कर्नाटकमधून एका उमेश काथा नामक कुख्यात आरोपीला अटक करण्यात आली होती. झोन १ चे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी सांगितले की ११२ इमर्जन्सी हेल्पलाइनवर कॉल आला होता. त्यात गडकरींच्या घरात बॉम्ब असल्याचे सांगितले गेले. लगेचच गडकरींच्या सुरक्षारक्षकांना आणि बॉम्ब शोध पथकाला सतर्क करण्यात आले. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, त्याने धमकी का दिली, यामागचा हेतू काय होता, हे शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय