मंत्री नितेश राणे उद्या घेणार अश्विनी वैष्णव यांची भेट

  89

कोकण रेल्वे प्रवासी समितीच्या भेटीत समस्यांवर सविस्तर चर्चा 


कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा, जलदगाड्यांचे थांबे, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे याची मागणी केली जाणार आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.


ओम गणेश निवास, कणकवली येथे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाने नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राणे म्हणाले, ‘आपल्या मागण्यांवर रेल्वे मंत्र्यांसमवेत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. यापुढे दर तीन महिन्यांनी मी व प्रवासी संघटना मिळून संयुक्त बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करू’, असे सांगितले.


गणपती सणासाठी विशेष गाड्या


२५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत मडूरे-दादर व सावंतवाडी-सीएसटीएम या दोन नव्या गाड्या तत्काळ सुरू कराव्यात. पुढे प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात. मडूरे-रत्नागिरी दरम्यान लोकल पॅसेंजर गाडी (सावंतवाडी-मंडगाव धर्तीवर) तत्काळ सुरू करावी. रेल्वे स्थानकांवरील सुविधा संदर्भात सिंधुदुर्ग, वैभववाडी आणि नांदगाव रेल्वे स्थानकांवर पीआरएस सेवा तातडीने सुरू करावी.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १० रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक त्या सेवा-सुविधा मिळाव्यात. सध्या कोकण मार्गावर धावणाऱ्या ७५ पैकी १६ जलदगाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबत नाहीत. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी मागणी करण्यात आली आहे. सावंतवाडी स्टेशनला ‘सावंतवाडी टर्मिनल’ असे नाव देण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा. कसाल रेल्वे स्थानक सुरू करणे, अशा अनेक मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या.

Comments
Add Comment

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

पिंपळी नदीवरील ५० वर्ष जुना पूल खचला, पूल वाहतुकीसाठी तात्काळ बंद

चिपळूण: सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात आपापल्या गावी लोकं मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. त्यामुळे या काळांत

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

सिंधुदुर्गांतील भावी पिढीच्या भविष्यासाठी मंत्री नितेश राणे आक्रमक दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या