Nitesh Rane: बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर नितेश राणे संतापले, काय म्हणाले वाचा...

  109

सिंधूदुर्ग:  सनातन धर्माने भारताचं वाटोळं केल्याचं बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपचे हिंदुत्ववादी नेते राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. "हिंदू दहशतवाद' किंवा 'सनातनी दहशतवाद' ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का ? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.





यासंदर्भात आपल्या "एक्स" अकाउंट वरून दिलेल्या प्रतिक्रियेत नितेश राणे यांनी पुढे म्हटले आहे की, खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो. जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे. 'सनातनी दहशतवाद' हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या 'बाटग्या' विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Comments
Add Comment

लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार ?

मुंबई : भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिलेले

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचे तीन ठिकाणी मतदान! भाजपचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले "आता खरे वोट चोर कोण?"

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील एकूण ९ सदस्यांचे दुबार तिबार मतदान सांगली : काँग्रेस

काँग्रेस खासदाराच्या घरात फूट, दिराचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : काँग्रेसच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू (सुरेश)

पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा मुंबई : मला नागपुरात उपमुख्यमंत्रीपदाचा विजयगड बंगला