अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांना मोजून मापून बोलण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना नाव न घेता सुनावले होते.
मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधाने काही केल्या थांबता थांबताना दिसून येत नाहीत. आता पुन्हा एकदा शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुक्लकाष्ठ सरकारच्या मागे लागण्याची चिन्ह आहेत.