प्रतिनिधी: युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ अस्थिरता धोरणाचा परिणाम भारतासाठी मर्यादित नसून युएस, युरोपियन शेअर बाजाराला शुक्रवारी मोठे नुकसान झाले आहे.अमेझॉन,अँपल,एनव्हीडीए यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घस रण झाल्याने युएस बाजार अक्षरशः गडगडले. अमेरिकेतील अनेक ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्ये (Stocks) मध्ये मोठे नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे. डाऊ जोन्स (Dow Jones) इंडस्ट्रीयल सरासरीत (Industrial Average) मध्ये तब्बल १.२% घसरण झाली आहे. इतकेच नाही तर एस अँड पी ५०० निर्देशांकात १.६% चरण घसरण झाली असून नॅस्डॅक (NASDAQ) मध्ये २.२% पेक्षाही अधिक घसरण झाली आहे गेल्या दोन महिन्यांतील ही एक मोठी घसरण मानली जाते. मोठ्या प्रमाणात ब्लू चिप्स कंपन्यांनी आ पली गुंतवणूक काढून घेतल्याने बाजारात मोठे नुकसान झाले. यांमध्ये अँपलसारखा शेअर २% पेक्षा अधिक पातळीने घसरला आहे.सर्वाधिक चर्चेतील व अधोरेखित घटना म्हणजे जुलै महिन्यातील कमजोर कामगार व रोजगार आकडेवारी जाहीर केल्यामुळे युएस च्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक (BLS) च्या अध्यक्षा डॉ ईरिका मॅकीइंटरफेअर (Erica McEntarfer) यांनी राजीनामा दिल्यानंतर बाजारातील वातावरण खवळले होते. मोठ्या प्रमाणात शेअर्सवर दबाव वाढला ज्यामुळे निर्देशांकात घसरण झाली.
ट्रम्प यांनी डॉ ईरिका यांच्यावर खोटे आकडे जाहीर केल्याचा आरोप केला आहे. त्यावर डॉ ईरिका यांनी'आपल्याला सूट ह़ोईल असा व्यक्तीची नेमणूक या पदावर करावी' असा शालजोडीत टोमणा ट्रम्प यांना मारला होता. सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प म्हणालेहो ते की,' मला नुकतेच कळविण्यात आले की आपल्या देशाचे 'नोकरीचे आकडे' बायडेन नियुक्त डॉ. एरिका मॅकएन्टार्फर, कामगार सांख्यिकी आयुक्त, यांनी तयार केले आहेत. त्यांनी कमला यांच्या विजयाची शक्यता वाढवण्यासाठी निवडणुकीपूर्वी बनावट नोक ऱ्याचे आकडे तयार केले होते. हा तोच कामगार सांख्यिकी ब्युरो आहे ज्याने मार्च २०२४ मध्ये नोकऱ्यांच्या वाढीचा अंदाज अंदाजे ८१८००० ने वाढवला होता आणि नंतर पुन्हा २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीच्या अगदी आधी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ११२००० ने वा ढवला होता.'
जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता दहशतीचा परिणाम युरोपमध्येही झाला. जर्मनीचा डीएएक्स (DAX) निर्देशांक २.७ टक्क्यांहून अधिक घसरला,फ्रान्सचा सीएसी CAC निर्देशांक २.९९ टक्क्यांनी घसरला आहे ज्यामुळे युरोपीय बाजारपेठांमध्येही विक्रीचा मोठा दबाव (Selling off pressure) दिसून आला. ट्रम्पच्या टॅरिफ निर्णयामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक परिणामांबद्दल गुंतवणूकदार चिंतेत आहेत. भारतीय बाजारपेठेत शुक्रवारी मोठी घसरण झाली. परदेशी संस्थात्म क गुंतवणूकदारांनी अनिश्चितता पातळीने आपली रोख गुंतवणूक गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भारतातून काढली आहे. हाच दबाव अमेरिकेतील मूळ असलेल्या कंपन्यांना अमेरिकेत जाणवले.
अमेरिकेतील कामगार बाजारपेठेतील अपेक्षेपेक्षा कमी वाढ झाले तसेच रोजगारी आकडेवारीत केवळ निसरडी वाढ झाल्याने बाजारात नाराजीचे परिणाम झाले.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या नवीन शुल्कांमुळे गुंतवणूकदारांनी सर्वत्र शेअर्सची विक्री केल्याने शुक्रवारी डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरीला धक्का बसला.अलीकडील हायफ्लायर एनव्हीडिया (एनव्हीडीए) देखील आज शेअर बाजारात डाऊ जोन्स निर्देशांक वाचवू शकला नाही. डाऊ १.२% किंवा ५४२ अंकांच्या घसरणीसह लाल रंगात बंद झाला. बाजारातील माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या व्यापार दिवशी ब्लू-चिप्सच्या गेजने ६०० पेक्षा जास्त अंकांची घसरण केली होती तर एस अँड पी ५०० १.६% खाली घसरला आहे ज्यामुळे सलग चार दिवस युएस बाजारात तोटा झाला.