पुण्यातील यवतमध्ये परिस्थिती नियंत्रणात, संचारबंदी लागू

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात एका व्यक्तीने स्टेटसला एक संदेश ठेवला होता. या स्टेटसवरुन गावात शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी हिंसा झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. आता यवतमध्ये संचारबंदी लागू आहे. विना परवानगी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. हिंसेप्रकरणी गुन्हे दाखल करुन पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी एक पुरावा म्हणून पोलिसांनी कॅमेरा फूटेजची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी यवतचे व्हायरल व्हिडीओ, प्रसारमाध्यमांकडे असलेले व्हिडीओ तसेच गावात असलेल्या कॅमेऱ्यांच्या फूटेजची तपासणी होणार आहे.

यवतमध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे शनिवार २ ऑगस्ट रोजी गावातील शाळांना बंद ठेवले आहे. गावातील सर्व दुकानं आणि व्यापार बंद आहे. नागरिकांनी घोळक्याने उभे राहू नये, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत. शुक्रवारी हिंसा करणाऱ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे.

शुक्रवारी सकाळी एका तरुणाने मध्यप्रदेश इथे एका ६० वर्षाच्या अध्यात्मिक गुरुने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असं एका चॅनेलवर आलेल्या बातमीचं स्टेटस ठेवलं होतं. या स्टेटसवरुन यवतमध्ये शुक्रवारी हिंसा झाली होती. या हिंसेप्रकरणी पोलिसांनी २० पेक्षा जास्त नागरिकांना अटक केली आहे.

याआधी चार दिवसांपूर्वी यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी तपास करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्याला अटक केल्यानंतर वातावरण शांत झाले होते. पण शुक्रवारी स्टेटसवरुन हिंसा झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.
Comments
Add Comment

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

REIL: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडची भारतातील एआय इकोसिस्टिम उभारण्यासाठी मोठी घोषणा

मोहित सोमण: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने आज मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण उपकंपनी

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून रशियन तेल आयात कपातीविषयक मोठे स्पष्टीकरण अद्याप सस्पेन्स कायम !

मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करण्याचे ठरवले अशी माहिती

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या