NSE SEBI: नॅशनल स्टॉक एक्सचेंज अडचणीत सेबीला भरला ४०.३५ कोटींचा दंड तरीही....

प्रतिनिधी: सेबीला एनएसई (National Stock Exchange NSE) कडून ४०.३५ कोटींची भरपाई मिळाली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने विनापरवानगी बाजारातील संवेदनशील माहिती त्यांच्याशी संबंधित असलेल्या एनएसई डेटा अँड ॲनालिटिक्स (NDAL) संस्थेला पुरवल्याचा ठपका एनएसईवर नियामक (Regulator) मंडळानी ठेवला आहे. बाजारात कंपनीचे आयपीओ येण्यापूर्वीच कथित प्रकरणात एक्सचेंजने डेटा ॲनालिटिक्स विभागाला पुरवली. ही संवेदनशील माहिती कंपनीच्या सूचीबद्ध (Listed) होण्यापूर्वी च लिक केल्याने इनसायडर ट्रेडिंग (Insider Trading) कायद्याचे उल्लंघन केल्याचे सेबीने म्हटले होते. त्याचीच भरपाई म्हणून झालेल्या सेटलमेंटमध्ये ४०.३५ कोटी रूपये नियामक मंडळाला (SEBI) भरले आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,एनए सईने स्वतःहून सेटलमेंट अर्ज दाखल केला आणि सिस्टीम ऑडिट आणि अनुपालन अहवाल यासारख्या गैर-मौद्रिक अटींसह (Non Monetary Terms) ४०.३५ कोटी पेमेंटचा प्रस्ताव मांडला.एक्सचेंजने केलेल्या अंतर्गत पुनरावलोकनात (Internal Review) व्यापक संघटनात्मक निर्णयांमुळे या चुका झाल्याचे स्पष्ट केले गेले तसेच हेही स्पष्ट केले की कोणतीही व्यक्ती वैयक्तिकरित्या जबाबदार नाही.'

याशिवाय को-लोकेशन आणि डार्क फायबर अँक्सेसशी संबंधित प्रकरणांसह इतर चालू आणि मोठ्या प्रकरणांमध्ये एनएसईला अजूनही छाननीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे त्यांच्यावरील अडचणीचे सावट कायम आहे. स्टॉक एक्सचेंजने २० जून रोजी त्या प्रकरणांमध्ये स्वतंत्र सेटलमेंट अर्ज (Settlement Application) दाखल केले आहेत आणि नियामकाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत.

आणखी काय घडले?

या प्रकरणात कंपनीच्या गोपनीय घोषणा सार्वजनिक होण्यापूर्वी त्यांच्याशी संबंधित ॲनालिटिक्सला केल्याचा माहितीचाही समावेश आहे. सेबीला असे आढळून आले की फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२२ दरम्या एनएसईने औपचारिक करार न करता संवेदनशील डेटा तृतीय-पक्ष विक्रेत्याला (Third Party Vendor) आणि त्यांच्या उपकंपनीला एनएसई डेटा अँड अँनालिटिक्स (एनडीएएल) ला देण्याची परवानगी दिली. त्यानंतर या उपकंपनीने इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन करून आपल्या क्लायंटना डेटा प्रसारित (Broadcast) केला.

सेटलमेंट ऑर्डरमध्ये असलेल्या माहितीप्रमाणे,एनएसईमधील सिस्टम आर्किटेक्चरमुळे एनडीएएल क्लायंटना एक्सचेंजच्या वेबसाइटवर सार्वजनिक प्रकाशनापूर्वी किंमत-संवेदनशील घोषणांचा अँक्सेस उपकंपनी (Subsidiary) ला मिळाला. यामुळे सेबीने म्हट ल्याप्रमाणे, इनसाइडर ट्रेडिंग प्रतिबंध नियम २०१५ यासह अनेक नियमांचे उल्लंघन एनएसईकडून झाले. सेबीने इतर प्रशासन समस्या अधोरेखित केल्या ज्यामध्ये,'योग्य मंजुरीशिवाय दंड माफ करण्याचा समितीचा अधिकार आणि असंबंधित संस्थात्मक गुंतवणूक दारांमधील क्लायंट कोड बदलांवर देखरेख करण्यातील त्रुटी अशा इतर समस्यांचाही आरोपपत्रात समावेश होता.
Comments
Add Comment

वर्ध्यात 'डीआरआय'च्या टीमकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना

Corona Remedies IPO Day 3: कोरोना रेमिडीज आयपीओत आक्रमक गुंतवणूक उदंड प्रतिसादासह अखेरच्या दिवशी ९४.१७ पटीने सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: कोरोना रेमिडीज (Corona Remedies Limited IPO) आयपीओची आज सांगता झाली आहे. ६५५.३७ कोटींचा आयपीओ ८ ते १० डिसेंबर या कालावधीत

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर

Silver Rate Today: चांदी २ लाख प्रति किलो जवळ पोहोचली युएस फेड निर्णयापूर्वी एक दिवसात चांदीत ९००० रूपयांनी विक्रमी वाढ

मोहित सोमण: फेडरल रिझर्व्ह आज व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात असताना चांदीच्या गुंतवणूक लक्षणीय वाढ

वार्नर ब्रदर्स- नेटफ्लिक्सचा ७२ अब्ज डॉलर करार टांगणीवर? खरेदीच्या युद्धात पॅरामाऊंट पिक्चर्सकडून ७९ अब्ज डॉलरची बोली

न्यूयॉर्क: युएसमध्ये वार्नर ब्रदर्स (Warner Bros) व नेटफ्लिक्स (Netflix) यांच्यातील होणाऱ्या संभाव्य ७२ अब्ज डॉलर्स डीलमुळे

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे