जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे

मनपाकडून सहा प्रकारच्या रंगांचे वाटप


मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अधिक बळकटी यावी यासाठी पालिकेकडून मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे.
यंदा मोफत शाडू माती, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर मूर्ती घडविण्यासाठी मंडपाकरीता जागा अशा सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून दिल्या आहेत.
या सुविधांमध्ये भर घालत मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंग पुरवठा करण्यात येणार आहे.


एकूण सहा पर्यावरणपूरक रंगांचा यामध्ये समावेश आहे. यात ७ हजार ८०० लीटर रंग आणि ३ हजार लीटर इको प्रायमर पुरविण्यात येणार आहे. मूर्तिकारांनी या रंगांचा वापर करून गणरायाच्या मूर्ती रंगवाव्यात. जेणेकरून जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल.


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत.


मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापणा व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. आतापर्यंत ९५२ टन माती पुरविण्यात आली आहे. यासोबतच ९९७ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडपासाठी जागाही देण्यात आली.



पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करा मूर्ती रंगविण्यासाठी वापरले जाणारे रंग विशेषत


रासायनिक रंग हे पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांचे प्रदूषण होऊन सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. या शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने मूर्तिकारांना आवाहन केले आहे की शक्य तितक्या पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा आणि जलाशयांचे प्रदूषण टाळावे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या