वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच जर भारताने असे काही केले तर ते चांगले पाऊल असेल असे देखील त्यांनी म्हंटले आहे. मात्र याबद्दल पुढे बोलताना ट्रम्प यांनी नेहमीसारखेच हवेत बाण सोडले, हे वृत्त किती अचूक आहे याबद्दल योग्य माहिती नसल्याचे देखील त्यांनी कबूल केले.
भारत गेल्या अनेक वर्षांपासून मित्र देश रशियाकडून कच्चे तेल विकत घेत आहेत. ज्याच्या विरोध अनेक वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करताना दिसून आले आहेत. त्यामुळे टेरिफची भीती दाखवत पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारत आणि रशिया तेल व्यवहाराबद्दल भाष्य केले आहे.
भारताच्या रशियाकडून तेल खरेदीबद्दल मोठे विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की मला वाटते की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. कारण हे मी ऐकले आहे, मात्र ते कितपत खरे आहे याची मला माहिती नाही.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, जेव्हा ट्रम्प यांना विचारले गेले की त्यांनी भारतावर दंड लादण्याची किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याची काही योजना आखली आहे का? तेव्हा ट्रम्प म्हणाले की "मी असे ऐकले आहे की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मी हे फक्त ऐकले आहे, परंतु ते खरे आहे की नाही हे मला माहित नाही. जर तसे असेल तर ते एक चांगले पाऊल आहे. आता पुढे काय होते ते पाहूया."
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाच्या तेल विक्रीतून मिळणारे उत्पन्न मर्यादित करण्यासाठी अमेरिकेवर जागतिक दबाव येत असताना ट्रम्प यांचे हे वक्तव्य समोर आले आहे.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आहे आणि पाश्चात्य निर्बंधांनंतर २०२२ पासून तो रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करत आहे. तथापि, अलीकडील माध्यमांच्या वृत्तांनुसार, भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी सध्या रशियाकडून खरेदी करणे बंद केले आहे. याचे कारण रशियाकडून देण्यात येणाऱ्या सवलतींमध्ये झालेली घट आणि शिपिंगशी संबंधित समस्या आहेत. मात्र, भारत सरकारने अद्याप याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.
ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात व्यापारातील अडथळे आणि रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारतावर टीका केली. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये त्यांनी निष्पक्ष व्यापार पद्धतींचे पालन न करण्याबद्दल आणि भारतावर जास्त कर लादण्याबद्दल बोलले. त्याचवेळी, व्हाईट हाऊसने भारतातून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर २५% कर लावण्याची घोषणा केली आहे, तसेच रशियासोबत सुरू असलेल्या ऊर्जा व्यापारासाठी दंड आकारला आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १ ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून लागू होणार होती. ...
#WATCH | "I understand that India is no longer going to be buying oil from Russia. That's what I heard, I don't know if that's right or not. That is a good step. We will see what happens..." says, US President Donald Trump on a question by ANI, if he had a number in mind for the… pic.twitter.com/qAbGUkpE12
— ANI (@ANI) August 1, 2025
भारताची प्रतिक्रिया काय आहे?
भारत सरकारच्या वतीने, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की भारत आणि रशियाचे दीर्घकालीन स्थिर आणि चाचणी केलेले संबंध आहेत. त्यांनी असेही पुनरुच्चार केले की भारत-अमेरिका संबंध सामायिक हितसंबंध, लोकशाही मूल्ये आणि लोकांमधील संबंधांवर आधारित आहेत आणि सध्याच्या तणाव असूनही, दोन्ही देशांमधील संबंध पुढे जात राहतील असा विश्वास व्यक्त केला.