संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्रति तोळा सोन्याच्या विचार केल्यास दणकून वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १५३० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १४०० रूपये व १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११४० रुप यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याची दरपातळी अनुक्रमे २४ कॅरेटसाठी १०१३५० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ९२९०० रुपयांवर, १८ कॅरेटसाठी ७६०१० रुपयांवर गेले आहेत. यामुळे सोन्याचे प्रति तोळा दरही गगनाला भिडले आहेत.
आज मुंबईसह देशातील मुख्य शहरात २४ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम दरपातळी १०१३५ रूपयांना व २२ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम दरपातळी ९२९० रुपयांवर तर १८ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम दरपातळी ७६८० रुपयांवर गेली होती. आज सोन्याच्या जागतिक पातळी व रील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत तब्बल १.५२% वाढ झाली होती. तर युएस गोल्ड स्पॉट दरात थेट २.२१% वाढल्याने सोने दरपातळी प्रति डॉलर ३३६२.८८ औंसवर गेला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील मल्टिकमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत ०.०२% किरकोळ घसरण झाली होती.
भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने इतके उसळले?
सोन्याचे उसळलेले दर हे जागतिक अस्थिरतेचे लक्षण असल्याचे म्हटले जाते. विशेषतः काल उशीरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिकस (Bureau of Labour Statistics) प्रमुख ईरिका मॅकीइंटरफेअर यांची हकालपट्टी केली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या जून महिन्यातील नोकरीच्या व बेरोजगारी आकडेवारी जाहीर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला. यंदा अहवालातील माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांतील रोजगार निर्मिती व कामगारांची आकडेवारीत तीन महिन्यांतील सर्वांधि क घसरण झाली. अपेक्षेपेक्षा कमी नोकरीच्या संधी निर्माण झाल्याने युएस शेअर बाजारातपण गुंतवणूकदारांनी नाराजी दर्शविली होती.जूनमधील अमेरिकेतील आकडेवारी कमजोर आल्याने ट्रम्प यांनी ईरिका यांच्यावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप देऊन त्यांना पदावरून दूर हटवले आहे. ट्रम्प यांच्या मते ईरिका मॅकीइंटरफेअर यांनी जाणीवपूर्वक खोटा अहवाल पसरवला. मात्र या आरोपांचे खंडन स्वतः लेबर कमिशनर ईरिका मॅकीइंटरफेअर यांनी करत, 'आता त्यांनी आपल्याला अनुकूल व्यक्तीची नियुक्ती करावी असा टोमणाही ट्रम्प यांना मारला आहे.
ज्यामध्ये बाजारातील अस्थिरतेचा फटका शेअर बाजारासह सोन्यातही बसला.चढउतार चालू असलेल्या डॉलरमध्ये वाढ झाल्याने सोन्याच्या दरपातळीला आधार मिळू शकली. किंबहुना भारतीय बाजारपेठेत आज मात्र रुपयात मोठी घसरण झाल्याने भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतीला सपोर्ट लेवल मिळाला नाही. परिणामी आज सोन्यात भाववाढ झाली आहे.याखेरीज अमेरिकेतील बिगरशेती (Non Farm) क्षेत्रातील वेतनवाढीचा आकडा ७३००० रूपयांवर आला आहे, मात्र खरं तर सुमारे १००००० नोकऱ्या वाढण्याची अपेक्षा युएस बाजारात होती. जूनच्या अहवालात बेरोजगारीचा दर ४.१% वरून किंचित वाढून ४.२% झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, मे आणि जूनच्या अहवालातील सुधारणांमध्ये २५८००० नोकऱ्या कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जुलैसाठी ७३००० नोकऱ्यांची वाढ अधिक कमकुवत दिसते. सप्टेंबरच्या FOMC बैठकीत फेड दर कपातीची शक्यता आता ७५% असल्याचे बाजारपेठेत दिसते. टेरिफ विषयांचा फटका आजही कायम असल्याने सोन्याला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.