Sunetra Pawar: राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीकडे जाणार ? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मुंबई: अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांकडे असलेली जवळपास सर्व खाती सुनेत्रा पवारांना मिळाली होती. केवळ अर्थ खातं मात्र राष्ट्रवादीकडे देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे दादा जाताच महायुतीत राष्ट्रवादी बॅकफुटला गेल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मोठी माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना राज्यात आणखी एक मोठी जबाबदारी मिळणार आहे.



अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे:


येत्या तीन ते चार महिन्यांत राज्याचे वित्त आणि नियोजन खाते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. याच बैठकीत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडं देण्याचा निर्णय झाला आहे.


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत विक्रमी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हे महत्त्वाचे खाते कोणाकडे द्यावे, याबाबत पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या सखोल चर्चेनंतर, तात्पुरत्या स्वरूपात हे खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवावं, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हे खाते राष्ट्रवादीला सुपुर्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Comments
Add Comment

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Perfect Tea Tips : चहा बनवताना दूध आधी टाकावं की नंतर ? घरी टपरीसारखा कडक चहा बनवा अन् 'या' सोप्या ट्रिक्स वापरून वाढवा चहाची चव!

मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की रिमझिम पावसात हातात गरमागरम चहाचा कप धरून बसण्याची मजा काही वेगळीच असते.

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक

Devendra Fadnavis : पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "