बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच पुलाची उभारणी

  47

अभियांत्रिकी क्षेत्रात पूल ठरणार चमत्कार


अहमदाबाद : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. साबरमती स्थानकापासून सुमारे १ किमी आणि अहमदाबाद स्थानकापासून सुमारे ४ किमी हे अंतर आहे. हा पूल भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्यांपैकी एक असलेल्या साबरमती नदीवर बांधण्यात येत आहे.


या हायस्पीड मार्गावर सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर मोठा पुल बांधला जात आहे. या पुलाची उंची ३६ मीटर असून म्हणजेच सुमारे अंदाजे ११८ फूट उंची इतका हा पूल उंच आहे. एकूण ४८० मीटर लांबीचा हा पूल, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद–दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जात आहे. ज्याची उंची मीटरमध्ये सुमारे १४.८ मीटर इतकी आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर तो एक इंजिनियरिंगचा चमत्कार ठरणार आहे.


अहमदाबाद जिल्ह्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उड्डाणपूल, पूल, रेल्वे मार्ग आणि मेट्रो कॉरिडॉर यांसारख्या अनेक इन्फास्ट्रक्चर मधून बांधला जात आहे. भारतीय महामार्ग काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्वाधिक उंचीच्या बांधकाम बिंदूपासून ५.५ मीटर इतके अनिवार्य उभे अंतर राखण्यासाठी, साबरमती नदीवरील पुलाचे खांब वाढीव उंचीने तयार करण्यात आले आहेत. या पुलावर एकूण आठ गोलाकार खांब असणार असून ते ६ ते ६.५ मीटर व्यासाचे बांधले जात आहेत. यापैकी चार खांब नदीच्या पात्रात, दोन खांब नदीच्या काठावर (प्रत्येक बाजूला एक) आणि दोन खांब नदीच्या काठाच्या बाहेर उभारण्यात आले. नदीच्या प्रवाहात अडथळा कमीत कमी राहावा यासाठी पुलाची रचना ठरवून करण्यात आली आहे.


मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील बहुतांश नदी पूल सुमारे ४० मीटर लांबीच्या छोट्या स्पॅनवर आधारित असलेले आहेत. तरी नदीच्या पात्रातील खांबांची संख्या कमी करण्यासाठी या पुलामध्ये ५० ते ८० मीटर लांबीच्या मोठ्या स्पॅनचा वापर करण्यात आला आहे. या पुलामध्ये प्रत्येकी ७६ मीटर लांबीचे ५ स्पॅन आणि प्रत्येकी ५० मीटर लांबीच्या २ स्पॅनचा समावेश आहे. प्रत्येक स्पॅनमध्ये २३ विभाग (सेगमेंट) असून ते सर्व ऑन-साईट (स्थळावरच) बांधकामाच्या पद्धतीने कास्ट केले जात आहेत.


हा पूल बॅलन्स्ड कँटीलिव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहे, हे एक विशेष बांधकाम तंत्र असून, जे खोल पाण्यातील आणि नद्यांवरील दीर्घ अंतराच्या पुलांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, ईडीनंतर अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती

मनोज जरांगे 29 ऑगस्टला मुंबईत येणार, नाशिक, जालनामध्ये बैठकांचं सत्र

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा निघणार काढणार असल्याचा

अकोटमध्ये गाढवांचा अनोखा पोळा

अकोला: अकोट शहरात आज गाढवांचा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना,

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला हिरवा कंदील

राज्य सरकारच्या पायाभूत समितीची मंजुरी पुणे : बहुप्रतिक्षित पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या

विश्वास नांगरे पाटील यांनी शेअर केले शालेय प्रगतीपुस्तक, गुण पाहून व्हाल अचंबित

मुंबई: विश्वास नांगरे पाटील यांनी शालेय जीवनातील इयता आठवीचे प्रगतीपुस्तक सोशल मिडियावर शेअर केले आहे. वार्षिक