Anil Ambani: अनिल अंबानी यांच्याविरोधात 'लूक आऊट' नोटीस

परवानगी शिवाय देश सोडण्यास मनाई

प्रतिनिधी: अनिल अंबानी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate ED) लूक आऊट नोटीस काढली आहे. त्यांना देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून खबर दारी घेतली जाणार असून देशाबाहेर विना परवानगी जाण्यास म ज्जाव केला आहे. देशातील विमानतळ व ट्रान्सिटच्या जागांवर विशेष 'नाकेबंदी' करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना देशाबाहेर जा ण्याचे मार्ग रोखण्यात आल्याचे सूत्रांनी प्रसारमाध्यमांना म्हटले आहे. या घटनेनंतर रिलायन्सचे अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढ ल्या आहेत. इतकेच नाही तर अनिल अंबानी यांना ५ तारखेला ईडीने १७००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून काल खुलासा करत ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर त्याचा कुठलाही परिणाम आपल्या दैनंदिन कामकाजावर अथवा कंपनीवर पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. संबंधित प्रकरणात १०००० कोटी फंडाची दुसरीकडेच वळ वणी झाल्याचा आरोप जुना घेतलेल्या कर्जासंबधित असून नव्या येस बँकेच्या कर्ज प्रकाराशी संबंधित त्याचा नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते तसेच ६५०० कोटींच्या कर्जासाठी १०००० कोटी वळवले असल्याचा दावा खोटा असल्याचं सांगितले. ही बातमी केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केला असल्याचा दावा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने केला होता.

मागील आठवड्यातच अंबानी यांच्या कंपनीशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या होत्या. ३० ऑगस्टलाही कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली होती. त्याचा च परिपाक म्हणून आता येस बँक प्रकरणासह स्टेट बँककडून घे तलेल्या कर्जासंबधित ही एकत्र कारवाई ईडीकडून केली जात आहे. एसबीआयने अनिल अंबानी यांच्यावर 'Fraud' हा शिक्का आ पल्या कागदपत्रात मारला होता असे स्वतः रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने एक्सचेंजला कळवले होते. त्यानंतर मोठ्या गदारोळानंतर अनि ल अंबानी हे प्राधिकरणाकडे दाद मागण्यास गेले जिथे त्यांनी आ पल्याला आपले म्हणणे मांडण्याचा पुरेसा वेळ दिला गेला नाही असे स्पष्ट केले. त्या युक्तिवादानंतर एसबीआयने हा शब्द हटवला. दरम्यान कथित प्रकरण एसबीआयकडून घेतलेले कर्ज वेगळ्या का रणासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एसबीआय प्रकरणातही ३००० कोटींचे कर्ज आपल्या हातचालाखीने भलतीकडेच वळवण्यात आल्याचा आरोप नियामक मंडळा ने केला आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत ही रक्कम बोगस शेल कंपनीच्या नावावर वळवण्यात आली असा ठपका अंबानींवर आहे.

या प्रकरणात येस बँकेच्या काही अधिकारी वर्गाला कर्ज मंजूर करण्यासाठी 'लाभ' झाल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. त्यामुळे याविषयीही चौकशी सुरू आहे. तसेच येस बँक व एसबीआय प्रकर णात ' मनी लॉन्ड्रिंग' अंतर्गत अनिल अंबानीची चौकशी होणारआहे. त्यामुळे एकूणच अंबानी यांच्या चौकशी विरोधात अडचणी वाढल्या आहेत.
Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या