वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली होती. हे प्रकरण अद्याप ताजं आहे. त्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. आचोळे पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१)(ब) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून करण्यात आली असून, तपासाअंती रेड्डी यांच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले होते. याअंतर्गत ED ने यापूर्वी वसईतील तसेच हैदराबाद येथील निवासस्थानी छापे टाकून तब्बल २३ कोटी २५ लाख ४० हजार रुपयांचे हिरे-जडजवाहीर आणि ८ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली होती.तपासानुसार, रेड्डी यांनी वसई विरार महानगरपालिकेमध्ये कार्यरत असताना आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली होती. त्यांच्याकडे आढळलेली संपत्ती ही त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अत्यंत जास्त असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


ही संपत्ती मिळवताना त्यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, उपअधीक्षक दत्ताराम कराडे व तपासी अधिकारी रविंद्र परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


तक्रारदाराच्या तक्रारीवरून आणि चौकशीअंती आज दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लवकरच रेड्डी यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण