स्मृति इराणी म्हणतात, ‘भारतातला प्रत्येक मुलगा-मुलगी होणार क्रिएटर’

नवी दिल्ली : "भारतीय रचनात्मकतेची क्रांती आता फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती शाळेच्या वर्गातून घराच्या अंगणात, आणि आता थेट डिजिटल जगतात पोहोचली आहे," असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी केलं आहे. त्यांनी भारतातील पहिल्या सार्वजनिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘वेव्स ओटीटी’ च्या उद्घाटनप्रसंगी हे विचार मांडले.


स्मृति इराणी म्हणाल्या, “आज १० कोटींपेक्षा जास्त भारतीय – शेतकरी, विणकर, शिक्षक, स्थानिक कारागीर – डिजिटल माध्यमातून क्रिएटर बनत आहेत. ही क्रांती फक्त दिल्ली-मुंबईच्या कॉर्पोरेट ऑफिसांतून नाही, तर गावातील अंगण, गल्ली आणि कम्युनिटी सेंटरमधून सुरू झाली आहे. स्वस्त तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या खोल मुळांमुळे हे शक्य झालंय.”



"ते फक्त कथा सांगत नाहीत – ते स्वतःची गोष्ट मांडत आहेत!"


बिहारचे भोजपुरी क्रिएटर्स शिक्षणातील अंतर भरून काढत आहेत. राजस्थानमधल्या महिलांनी मोबाइलद्वारे पारंपरिक कथाकथन नव्याने सादर केलंय. महाराष्ट्रातील १७ वर्षीय श्रद्धा गरद हिने महामारीदरम्यान सुरू केलेल्या डिजिटल कढाई चॅनेलमुळे आज ती तिच्या गावातील मुलींची मेंटॉर बनली आहे.



इराणी यांनी पुढे म्हटले, "देशभरात शिक्षक हे क्रिएटर बनत आहेत आणि विद्यार्थी ‘सोलो-प्रेन्योर’!" पाटण्याचे खान सर, ज्यांनी केवळ चॉक आणि कॅमेराद्वारे लाखो विद्यार्थ्यांना शिकवलं; बंगळुरूच्या परिक्रमा फाउंडेशन ने रोजच्या शिक्षणातच गोष्ट सांगण्याला महत्त्व दिलंय – हे सर्व या नव्या भारताची उदाहरणं आहेत.


‘वेव्स ओटीटी’ बद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “हे केवळ कंटेंटचं माध्यम नाही, तर एक लोकशाही पूल आहे – जो गावांमधून येणाऱ्या क्रिएटर्सना अधिकृत व्यासपीठ आणि मान्यता देतो. आता कंटेंट केवळ बघायचं नाही – तयार करायचं आहे.”


त्यांनी मांडलेली ही क्रिएटिव्ह क्रांतीची झळाळती कल्पना भारताच्या भविष्याचा नवा मार्ग दर्शवते – जिथे प्रत्येक भारतीय मूल केवळ प्रेक्षक नसेल, तर निर्माता असेल!

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा