माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदावरून हटवले, दत्ता भरणेंकडे कृषी खात्याचा पदभार

ऑनलाइन पत्ते खेळण्याचे प्रकरण माणिकराव कोकाटेंच्या अंगलट


मुंबई: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले असून, आता त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एका विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ऑनलाइन रमी गेम खेळल्याच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दत्ता भरणेंकडे कृषी खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत कोकाटे पांचा खातेबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.



रमी गेम प्रकरण आणि वाद


आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा एक व्हिडिओ सार्वजनिक केला होता, ज्यात ते विधिमंडळाच्या सत्रादरम्यान आपल्या मोबाइलवर ऑनलाइन रमी गेम खेळताना दिसत होते. या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला आणि महाराष्ट्रातील शेतीच्या संकटातही मंत्र्यांच्या या असंवेदनशील कृत्याबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी तीव्र टीका केली.


या प्रकरणानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु त्यांना केवळ ताकीद देऊन सोडून देण्यात आले होते. या घटनेमुळे आणि कोकाटे यांच्याशी संबंधित मागील काही वादांमुळे सरकारवर सतत टीका होत होती. या सततच्या टीकेमुळेच सरकारने कोकाटे यांच्याकडील महत्त्वाचे कृषी खाते काढून घेतले असून, त्यांना कमी महत्त्वाचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय दिले असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर

बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस 'मातोश्री'त का ठेवला?

रामदास कदम यांचे दसरा मेळाव्यात खळबळजनक विधान; 'मृत्युपत्रात सही कोणाची होती?' चौकशीची मागणी मुंबई: शिवसेनेचे

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या