चाकरमान्यांसाठी आणखी एक दिलासा, मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी अतिरिक्त ४४ गाड्या

  60

मुंबई (प्रतिनिधी) : दरवर्षा प्रमाणेच मुंबईतील चाकरमान्यांना आता कोकणातील गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यांच्या गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने आधीच २५० गणपती विशेष ट्रेन सोडण्याचे जाहीर केले होते. त्यातच आता या २५० गाड्यांव्यतिरिक्त, मध्य रेल्वे आणखी ४४ गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. तसेच, दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनचा विस्तार आणखी २ सेवा वाढवून करणार आहे. येत्या गणपती उत्सवादरम्यान गणपती भक्तांच्या सोयीसाठी आतापर्यंत घोषित झालेल्या एकूण गणपती विशेष ट्रेनची संख्या आता २९६ झाली आहे.


१. लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी रोड लोकमान्य टिळक टर्मिनस द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण ८ सेवा)


०११३१ द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक २८.८.२०२५, ३१.८.२०२५, ४.९.२०२५ आणि ७.९.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)
०११३२ द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेन प्रत्येक गुरुवार आणि रविवार दिनांक २८.८.२०२५, ३१.८.२०२५, ४.९.२०२५ आणि ७.९.२०२५ रोजी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण ४ सेवा)
थांबेः ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.


डब्ब्यांची रचना : २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन.


२. दिवा-खेड-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष (३६ सेवा)


०११३३ मेमू विशेष ट्रेन २२.८.२०२५ ते ८.९.२०२५ पर्यंत दिवा येथून दररोज दुपारी १३.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी २०.०० वाजता खेड येथे पोहोचेल. (एकूण १८ सेवा)
०११३४ मेमू विशेष ट्रेन २३.८.२०२५ ते ९.९.२०२५ पर्यंत खेड येथून दररोज सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.०० वाजता दिवा येथे पोहोचेल. (एकूण १८ सेवा)
थांबेः निळजे, तळोजा पंचनाद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासु, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी कळंबणी बुद्रुक,
डब्ळ्यांची रचना : ८ कोचची मेमू रेक्स (८ कार मेमू रेक्स)




अनारक्षित विशेष ट्रेन २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर कालावधीत, ३ ऑगस्टपासून बुकिंग


दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन आता २२.०८.२०२५ ते १०.०९.२०२५ या कालावधीत चालवण्यात येतील. गणपती विशेष ट्रेन क्रमांक 01131 साठी आरक्षण ३.८.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि [www. irctc.co.in] (http:// www.irctc.co.in)या संकेतस्थळावर सुरू होईल. अनारक्षित कोचचे बुकिंग यूटीएस सिस्टमद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/ एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानासाठी सामान्य शुल्क आकारले जाते. विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES APP डाउनलोड करा.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत