बायोमॅट्रिक आधारे पेमेंट -
आता आपल्याला बायोमेट्रिक आधारे पेमेंट करावे लागणार आहे. म्हणजेच युपीआय बायोमेट्रिकला आवश्यक असणारे सेंसर युपीआय तंत्रज्ञानात वापरू शकते. त्यामुळे अधिक पारदर्शकता येईल असे सांगण्यात आले आहे.
सर्व युपीआय सेवा प्रदात्यांना (Service Providers) ३१ जुलैपर्यंत त्यांच्या अँप्समध्ये हे बदल पूर्णपणे समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि नवीन नियम १ ऑगस्टपासून लागू केले जातील. एनपीसीआयने असा इशारा दिला आहे की पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
आणखी काय महत्वाचे बदल युपीआयमध्ये केले आहेत?
१. बॅलन्स चेक मर्यादा
वापरकर्त्यांना प्रत्येक युपीआय अँपमध्ये दिवसातून फक्त ५० वेळा बँक बॅलन्स तपासण्याची परवानगी असणार आहे. NPCI दिलेल्या माहितीनुसार, सर्वात लक्षणीय बदलांपैकी एक म्हणजे प्रत्येक युपीआय अँपसाठी दररोज ५० बॅलन्स चौकशीची मर्यादा असणार आहे त्याहून अधिक वेळा शिल्लक चेक करता येणार नाही. युपीआय व्यवहारात प्रचंड वाढ झाल्याने वाढता लोड कमी करण्यासाठी (API Load) कमी करण्यासाठी ही मर्यादा डिझाइन केली गेली आहे. जर एखाद्या वापरकर्त्याने ही मर्यादा गाठली तर त्या विशिष्ट अँपवर पुढील बॅलन्स चेक २४ तासांसाठी ब्लॉक केले जातील असे नियामकांनी म्हटले आहे.
२. ऑटो-बॅलन्स डिस्प्ले
प्रत्येक यशस्वी युपीआय व्यवहारानंतर, उपलब्ध बॅलन्स स्वयंचलितपणे (Automatic) डिस्प्ले ह़ोऊ शकतो.ज्यामुळे वारंवार मॅन्युअल तपासणीची फार गरज भासणार नाही.
३. व्यवहार तपासणी अनेकदा होणार प्रतिबंधित
वापरकर्त्यांना प्रलंबित व्यवहाराची स्थिती दिवसातून फक्त तीनदाच तपासण्याची परवानगी असणार आहे. प्रत्येक तपासणीचा प्रयत्नात ९० सेकंदांचा अनिवार्य अंतर असणे आवश्यक असेल
४) अकाउंट लिंकिंग कॅप
वापरकर्ता आता एकाच युपीआय अँपवर दररोज २५ बँकट खातीच लिंक करू शकणार आहे. हे मोबाइल नंबर वापरून बँक खात्याचे तपशील मिळविण्यासाठी लागू होते मात्र आता बँकिंग एपीआय (API) मधील ऑनलाईन रहदारी चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यासाठी ही मर्यादा घालण्यात आली आहे.
५) प्राप्तकर्ताचे नाव दिसणे (दृश्यमानता) (Payee Name Visibility) -
पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी, यूपीआय अँप्सनी त्यांच्या बँकेत नोंदवलेल्या पेईचे नोंदणीकृत नाव प्रदर्शित केले पाहिजे असा नियम लागू केला गेला आहे.
६) ऑटो-डेबिट विंडो प्रतिबंधित
आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे मासिक सबस्क्रिप्शन, ईएमआय किंवा गुंतवणूक हप्ते यासारख्या ऑटो-डेबिट आदेशांचाही (Auto Debit Orders) समावेश आहे.
हे शेड्यूल केलेले पेमेंट आता फक्त नॉन-पीक अवर्समध्ये प्रक्रिया केले जातील जेणेकरून इतर दैनंदिन उच्च-व्हॉल्यूम व्यवहारिक (Transactional) विंडो सुलभ होतील. आवर्ती पेमेंट (EMI),ओटीटी सबस्क्रिप्शन, म्युच्युअल फंड एसआयपी) आता फक्त नॉन-पीक अवर्समध्ये प्रक्रिया केले जातील असे एनपीसीआयने म्हटले आहे.
या काळात मर्यादा लागू -
रात्री ९:३० नंतर
सकाळी १०:०० पूर्वी