इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला!

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांना ९ मे २०२३ रोजीच्या दंगलीशी संबंधित आठ खटल्यांत सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. इतकंच नव्हे, तर त्यांच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवर न्यायालयाने कोणतीही नोटीसही जारी केली नाही. आता या प्रकरणांची पुढील सुनावणी थेट १२ ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.


या खटल्यांचा संबंध ९ मे २०२३ रोजी देशभरात उसळलेल्या हिंसाचाराशी असून, लाहोर कॉर्प्स कमांडरच्या घरावर हल्ल्याचाही त्यात समावेश आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने इम्रान खान यांना या सर्व प्रकरणांमध्ये जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाद मागितली होती, मात्र २४ जून रोजी उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली.



गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली होती. या प्रकरणांची सुनावणी मुख्य न्यायाधीश याह्या आफ्रिदी यांच्या अध्यक्षतेखालील दोन सदस्यीय खंडपीठाने केली.


इम्रान खान यांचे मुख्य वकील सलमान सफदर हे देशाबाहेर असल्याने, पीटीआयचे सरचिटणीस सलमान अक्रम राजा यांनी त्यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी खंडपीठाकडे विनंती केली की, संबंधित पक्षांना नोटीस बजावण्यात यावी आणि सुनावणी पुढील आठवड्यात ठेवण्यात यावी. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळत सुनावणी १२ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.


या निर्णयामुळे तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला असून, त्यांच्यावर असलेल्या कायदेशीर गुंतागुंतीत अधिक वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

California Assembly : कॅलिफोर्निया असेंब्लीचा ऐतिहासिक निर्णय; ८ नोव्हेंबरला ‘दिवाळी डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर

कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेट असेंब्लीने गुरुवारी एक ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर करत यंदा रविवार, ८

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या

Pirates kidnap Indians : सागरी चाच्यांचा धुमाकूळ, २२ भारतीयांसह ३० जणांचे अपहरण; येमेन आणि सोमालियाच्या समुद्रातील धक्कादायक घटना

येमेन : येमेन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सागरी चाच्यांनी दोन व्यावसायिक

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Imran Khan : इम्रान खान यांना रात्री रुग्णालयात हलवले; वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात पाठवले

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांना रात्री कडक

Mehul Choksi's Lawyer : मेहुल चोक्सीच्या वकिलाच्या अडचणी वाढल्या; लंडनमध्ये लैंगिक अत्याचाराच्या चार आरोपांखाली अटक

लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर