Samsung Tesla: सॅमसंग व टेस्लाकडून उद्योगविश्वातील मोठी बातमी मस्क म्हणाले....

  61

Samsung कंपनीला Tesla कडून चिप्स बनवण्याचे मोठे कंत्राट

प्रतिनिधी:सॅमसंग कंपनीने टेस्ला या जागतिक दर्जाच्या कंपनीकडून १६.५ अब्ज डॉलर्सचे कंत्राट मिळवले आहे. यासंबंधीची माहिती स्वतः टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क यांनी देत सॅमसंगकडून खास टेस्लासाठी A16 या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेक्स जनरेश न चिप्स (Next gen AI Chips) बनवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चिप्स बनवण्याच्या प्रकल्प टेलर टेक्सास (Taylor Texas) येथे होणार आहे. यासंबंधीची माहिती सॅमसंगकडून युएस बाजारातील रेग्युलेटरी फायलिंग म ध्ये स्पष्ट करण्यात आली होती. या नियामक मंडळाच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, सॅमसंगने २०२३ पासूनच १६.५ अब्ज डॉलर्सचे हे नवे डील टेस्लाकडून मिळवले गेले असल्याचे म्हटले आहे. २०२४ पासून कंपनीच्या (Samsung) मिळालेल्या मह सूलात या डीलचा वाटा जवळपास ७.६% आहे असेही सॅमसंगने स्पष्ट केले आहे. यासंबंधीची पुष्टी एलोन मस्क यांनी एक्सवर केली. त्यात त्यांच्या अंदाजानुसार आगामी काळात हे डील १६.५ अब्ज डॉलरवर जाऊ शकते.

गेल्या दोन तीन वर्षांत सॅमसंगची महसूली तब्येत चांगली नाही. कंपनीच्या महसूलात वाढ होत असली तरी सातत्याने निव्वळ तोट्यात वाढ होत आहे व स्थूल नफ्यातही मागील आर्थिक वर्षात घसरण झाली होती. याच पार्श्वभूमीवर डीलच्या माध्यमातून आपल्या मह सूलासह नफ्यात वाढ करण्याचा सॅमसंगचा मानस दिसतो. आर्थिक २०२६ वर्षाच्या मध्यावर टेक्सास येथील प्रकल्पाला सुरूवात होऊ शकते. युएस बाजारातील रेग्युलेटरी माहितीनुसार शेवटच्या निकालानुसार, सॅमसंगने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) आपल्या मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत यावर्षी तिमाहीत ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) मध्ये ५०% घसरण दर्शविली आहे. यापूर्वी काही अफवांनुसार सॅमसंगने आपल्या नुकसान प्रविष्ट विभागाला ताळे लावण्याचे ठरवले आहे अशा प्रकारच्या बातम्या माध्य मात आल्या होत्या मात्र कंपनीचे चेअरमन ली जेई यंग (Lee Jae Young) यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

बाजार विश्लेषकांचा मते, ही टेस्ला, सॅमसंगकडून मोठे पाऊल आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच तांत्रिक बाबीत सॅमसंगने एक पाऊल पुढे टाकल्याने ऑटोमोटिव सेक्टरमध्ये तंत्रज्ञानातील गुंतवणूकीत मोठी वाढ होऊ शकते.
Comments
Add Comment

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

लवकरच तानाजी सावंतांचे राजकीय पुनर्वसन होणार ?

मुंबई : भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिलेले

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी