NSDL IPO: उद्यापासून एनएसडीएल या बड्या दिग्गज कंपनीचा आयपीओ बाजारात! बजाज ब्रोकिंग रिसर्चने दिला 'Buy Call' 'या' कारणांसाठी

७६० ते ८०० रूपये प्राईज बँड निश्चित

मोहित सोमण:  यावर्षीचा मोठा आयपीओ उद्यापासून बाजारात दाखल होत आहे. देशातील सगळ्यात दोन मोठ्या डिपॉझिटरी पैकी एक एनएसडीएल (NSDL) कंपनीचा आयपीओ दाखल होत असून एचडीबी फायनांशियल सर्व्हिसेस नंतरचा हा बहुप्रतिक्षित आयपीओ ३० जुलै ते १ ऑगस्ट कालावधीत बाजारात उपलब्ध असेल.आयपीओपूर्वीच ग्रे मार्केटमध्ये (Grey Market Price) मध्ये आतापासूनच कंपनीच्या मूळ किंमतीपेक्षा १७% अधिक किंमतीवर हा शेअर बाजारात उघडेल अशा अटकळी मांडल्या जात आहे. ४०११.६० कोटींचा आयपीओ उद्या येईल ज्यामध्ये ऑफर फॉर सेल (OFS) साठी ५.०१% शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतील.

कंपनीच्या माहितीनुसार, या आयपीओसाठी कंपनीने प्राईज बँड (Price Band) ७६० ते ८०० रूपयांवर निश्चित केला आहे. अर्ज करण्यासाठी १८ शेअरचा गठ्ठा (Lot) उपलब्ध असेल. त्यामुळेच किरकोळ गुंतवणूकदारांना १३६८० रूपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य असेल. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून करणार आहे. एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना ४ ऑगस्टला समभागाचे वाटप (Allotment) करणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही प्रति शेअर ७६ रूपयांची सवलत दिली आहे. माहितीनुसार, कंपनीच्या एकूण गुंतवणूकीपैकी ५०% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), किरकोळ गुंतवणू कदारांसाठी ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% आरक्षित ठेवण्यात आला आहे.

कंपनीबद्दल -

एनएसडीएल ही सेबी पंजीकृत संस्था असून २०१२ मध्ये संस्था स्थापन झाली होती. ही संस्था प्रामुख्याने भारतीय बाजारात डिपॉझिटरी व तत्सम सेवा देण्याचे काम करते.

कंपनीची आर्थिक स्थिती -

कंपनीच्या माहितीनुसार, एनएसडीएलला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) महसूलात १२% वाढ झाली आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ५१% वाढला आ हे.कंपनीच्या महसूलात मागील वर्षाच्या १३६५.७१ कोटीवरून मार्च २०२५ पर्यंत १५३.१९ कोटीवर गेले आहे. कंपनीचा करोत्तर नफा (PAT) मागील वर्षाच्या मार्च २०२४ मधील २७५.४५ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ पर्यंत ३४३.१२ कोटींवर गेले आहे. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये मागील वर्षी तिमाहीतील ३८१.१३ कोटीवरून वाढ होत मार्च २०२५ पर्यंत ४९२.९४ कोटीं वर गेले आहे. कंपनीने भागभांडवल १६००० कोटींचे आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर शेअर बाजारातील इक्विटी गुंतवणूक करुन त्याचा लेवरेज घेण्यासाठी आयपीओ लाँच करण्यात आला आहे.

या आयपीओला सबस्क्राईब करावे का?

बजाज ब्रोकिंग रिसर्चने कंपनीच्या आयपीओला 'Buy Call' दिला असून प्रदीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी असे आपल्या रिसर्च अहवालात म्हटले आहे. अहवालातील दिलेल्या माहितीनुसार कंपनीची शक्ती नक्की कशात आहे जाणून घेऊयात...

तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायांची विस्तृत श्रेणी चालवणारी भारतातील पहिली आणि आघाडीची डिपॉझिटरी

तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नवोपक्रमांवर जोरदार लक्ष केंद्रित करणे

मजबूत आयटी पायाभूत सुविधा, जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्क आणि सायबर-सुरक्षा उपाय जे डिपॉझिटरी सिस्टमची सुरक्षितता आणि अखंडता सुनिश्चित करण्यावर केंद्रित

आवर्ती उत्पन्नाच्या महत्त्वपूर्ण प्रमाणात स्थिर महसूल आधार

डीमॅट खाती आणि चांगल्या वैविध्यपूर्ण व्यवसाय वर्टिकलमध्ये आयोजित वैविध्यपूर्ण मालमत्ता वर्ग

कंपनीपुढील मर्यादा - (Limitations)

कंपनी तिच्या कामकाजासाठी जटिल माहिती तंत्रज्ञान प्रणाली आणि नेटवर्कवर अवलंबून असते. तांत्रिक अडचणी, सायबरसुरक्षा उल्लंघन किंवा इतर समस्यांमुळे होणारा कोणताही मोठा व्यत्यय तिच्या व्यवसायावर, प्रतिष्ठेवर, ऑपरेटिंग परिणामांवर आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम करू शकतो. अशा व्यत्ययांमुळे नियामक दंड देखील होऊ शकतो, ज्यामध्ये सेबीने लादलेले आर्थिक प्रतिबंध समाविष्ट आहेत.

कठोर नियामक चौकटीत काम करताना, लागू असलेल्या कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांचे पूर्णपणे पालन करण्यात कंपनीची असमर्थता भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डद्वारे अंमलबजावणी कारवाई आणि कायदेशीर कार्यवाही सुरू करू शकते.

अत्यंत नियंत्रित वातावरणात कंपनीला तिच्या व्यवसायाच्या ओळींमध्ये तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागतो. समवयस्कांशी प्रभावीपणे स्पर्धा करण्यात अयशस्वी झाल्यास तिच्या व्यवसाय कामगि रीवर, आर्थिक स्थितीवर, रोख प्रवाहावर आणि एकूण कामकाजाच्या परिणामांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो..

यामुळेच गुंतवणूकदारांनी आगामी लिस्टिंगसह हा शेअर दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी  शेअर खरेदी करावा असा बहुतांश तज्ञांनी म्हटले आहे. मात्र यात गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा‌ असे बाजारातही म्हटले जात आहे.
Comments
Add Comment

शेअर बाजारात प्री ओपन सत्रात सकारात्मक संकेत सेन्सेक्स ३०० व निफ्टी ७३ अंकाने उसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण:जागतिक पातळीवरील रॅलीचा फायदा आजही भारतात कायम राहू शकतो. प्री ओपन सत्रात सेन्सेक्स ३०० अंकांने व

लष्कर प्रमुखांचे विधान आणि पाकिस्तानचा उडाला थरकाप! म्हणाले, भारत कधीही घुसखोरी करू शकतो...

लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने

नितीश कुमार यांचा आज शपथविधी

दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचेच नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त (जेडीयू) आणि भाजपने

लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत हल्ले आम्हीच केले!

नवी दिल्ली  : दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटात १५ लोक ठार व डझनहून अधिक

दिल्लीभेटीत भाजपच्या शिवसेनाविरोधी ऑपरेशन लोटसवर आक्षेप?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जावून त्यांनी

निवडणुकीवर संकट?

आरक्षण मर्यादा प्रकरणी २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नवी दिल्ली : राज्यात सध्या सुरू