प्रतिनिधी: आजपासून तीन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहेत. आदित्य इन्फोटेक लिमिटेड, लक्ष्मी इंडिया फायनान्स लिमिटेड, कायटेक्स फॅब्रिक्स लिमिटेड या तीन कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होत आहेत. जाणून घेऊयात ति न्ही आयपीओची (IPO) सविस्तर माहिती...
१) Aditya Infotech Limited- आदित्य इन्फोटेक लिमिटेड कंपनीचा आयपीओ आजपासून म्हणजेच २९ जुलै ते ३१ जुलै कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. १३०० कोटींचा आयपीओ बीएसई (BSE) व एनएसई या दोन्ही बाजारात ५ ऑग स्टला सूचीबद्ध (Listed) होणार आहे. या आयपीओसाठी ६४० ते ६७५ रूपये प्रति शेअर प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्यात आला आहे. २२ शेअरचा गठ्ठा (Lot) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४०८० रूपये (२२ Lot) गुंतवावे लागणार आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे. एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. १३०० कोटीपै की ५०० कोटींचा हा फ्रेश इशू (Fresh Issue) असेल. कंपनीच्या माहितीनुसार, या आयपीओतील एकूण गुंतवणूकीपैकी ७५% पर्यंत वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers QIB), १०% वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसा ठी (Retail Investors), उर्वरित १५% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) यांच्यासाठी उपलब्ध असेल. २ लाखांपर्यंत गुंतवणूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करता येईल. ५ ऑगस्टला हा आयपीओ सूचीबद्ध होण्यापूर्वी १ ऑगस्टला पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येईल.
हरी शंकर खेमका, आदित्य खेमका, अनन्मय खेमका, हरी खेमका यांची कौंटुबिक ट्रस्ट कंपनीची प्रवर्तक (Promoter) आहे. आयपीओपूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांचे कंपनीतील भागभांडवल (Stake) ९२.५८% आहे जे आयपीओनंतर ७६.७% असेल.
कंपनीची आर्थिक स्थिती -
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १२% वाढ नोंदवली गेली होती. तर करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) यामध्ये मार्च २०२५ पर्यंत २०५% वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहि तीनुसार, ३१ मार्च २०२४ मधील २७९५ कोटींच्या तुलनेत ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीच्या महसूलात (Revenue) इयर ऑन इयर बेसिसवर ३१२२.९३ कोटींवर गेला. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर मार्च २०२४ मधील ११५.१७ कोटींच्या तुलनेत वाढ होऊन मार्च २०२५ पर्यंत नफा ३५१.३७ कोटींवर गेला. कंपनीच्या ईबीटात (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये मागील ३१ मार्च २०२४ मधील २३६.४८ कोटींच्या तुलनेत वाढत मार्च २०२५ पर्यंत २५८.३९ कोटींवर गेला. कंपनीचे बाजार भांडव ल (Market Capitalisation) ७९११.८९ कोटी रुपये आहे.
कंपनीबद्दल -
नवी दिल्ली स्थित आदित्य इन्फोटेक लिमिटेड (Aditya Infotech Limited) कंपनी व्हिडिओ सिक्युरिटीज, सीसीटीव्ही कॅमेरे सर्व्हैलेंस, ४जी ५ जी इक्विपमेंटचे व तत्सम वस्तूंचे उत्पादन करते. देशभरात कंपनीच्या ४१ शाखा असून त्यांचे विविध शहरांमध्ये वितर कांचे जाळे (Network) आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर ३५० कोटींच्या थकबाकी चुकती करण्यासाठी तसेच दैनंदिन कामकाजासाठी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आज पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन मिळाले?
कंपनीला पहिल्या दिवशी १.८० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी ५.९० पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.०१ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २.६७ पटीने मिळाले आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सची जीएमपी (GMP) २४० ते २५० रूपये प्रिमियम भावाने सुरू आहे.
२) Laxmi India Finance Limited - कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल होत आहे. आज २९ जुलैपासून ते ३१ जुलैपर्यंत हा २५४.२६ कोटींचा आयपीओ बाजारात उपलब्ध असेल. माहितीनुसार, बीएसई व एनएसईत आयपीओ ५ ऑगस्ट ला सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, आयपीओसाठी प्राईज बँड (Price Band) १५० ते १५७ रूपये प्रति समभाग (Share) ठेवण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी ९४ शेअर्सचा गठ्ठा (Lot) गुंतवणूकदारांना खरेदी करावा लागणार आहे. आयपीओकरिता किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४१०० रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. पी एल कॅपिटल मार्केट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून आयपीओसाठी काम करणार आहे तर एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमि टेड कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.
आयपीओतील १६५.१७ कोटींचा फ्रेश इशू असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एकूणच आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ३१८६२५३ शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (N II) २१.१२% वाटा व किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) ४९.२९% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. कर्मचाऱ्यांना १.४२% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. दिपक बैद, प्रेमदेवी बैद, हिरक विनिमय लिमिटेड, दीपक हायटेक मोटर्स लिमि टेड, प्रेम डिलर्स व विवान बैद हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांचे कंपनीतील भागभांडवल (Stake) ८९.०५% होते ते आयपीओनंतर घसरणार आहे.
कंपनीबद्दल -
१९९६ साली ही कंपनी स्थापन झालेली कंपनी एक एनबीएफसी (विना बँकिंग वित्तीय संस्था NBFC) कंपनी आहे. कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा ग्राहकांना पुरवते. ज्यामध्ये एमएसएमई, लघू उद्योगांना लघू कर्ज, वाहन कर्ज अशाप्रकारच्या वित्तीय सेवां चा समावेश आहे.
कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबद्दल-
उपलब्ध माहितीनुसार कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर महसूलात ४२% वाढ झाली होती तर करोत्तर नफा (PAT) मध्ये ६०% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२४ मधील १७५.०२ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये २४८.०४ कोटीवर महसूल गेला आहे. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) मध्ये मार्च २०२४ मधील ११४.५९ कोटींच्या तुलनेत वाढत मार्च २५ पर्यंत १६३.८८ कोटींवर गेला. कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च २०२४ मधील २२.४७ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ मध्ये ३६.०१ कोटींपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) सध्या ८२५.८३ कोटींवर आहे. कंपनीचे दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर भांडवली गरजेसाठी करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी कंपनीला सबस्क्रिप्शन किती मिळाले?
पहिल्या दिवशी कंपनीला ०.३२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. ज्यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.५२ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.१० वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.१४ पटीने मिळाले आहे. सध्या कंपनीचा शेअर ग्रे मा र्केटमध्ये जीएमपी (GMP) मूळ किंमतीवरच कायम आहे.
३) Kaytex Fabrics Limited - ६९.८१ कोटींच्या कंपनीच्या आयपीओला आज २९ जुलैपासून सुरूवात झाली असून ३१ जुलैपर्यंत आयपीओ गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. ५ ऑगस्टला आयपीओ एनएसई एसएमईवर (NSE SME) सूचीबद्ध होईल. १७ १ ते १८० रूपये प्रति समभाग प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान ८०० शेअर्सची खरेदी करावी लागणार आहे. आयपीओसाठी सोक्राडामुस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड (Socradamus Capital Private Limited) ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहे तर बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रार म्हणून काम पाहिल, मार्केट मेकर म्हणून ग्रेटेक्स शेअर ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड आयपीओसा ठी काम करणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) १ ऑगस्टला करण्यात येणार आहे. एकूण आयपीओतील ५४.०९ कोटी शेअरचा फ्रेश इशू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. ऑफर फॉर सेल (OFS) साठी १२.२३ कोटीचे शेअर उपलब्ध होते. संजीव अंधारी व अमित कंधारी हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओपूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांचे भागभांडवल १००% होते ते आयपीओनंतर ७८.२३% वर घसरले. यापूर्वीच कंपनीने १८ कोटींची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून मिळवली आहे.
कंपनीबद्दल -
१९९६ साली ही कंपनी स्थापन झाली आहे. ही प्रामुख्याने फास्ट फॅशन, टेक्सटाईल, व तत्सम उत्पादनांशी संबंधित आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती -
माहितीनुसार कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर २३% वाढ व करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ४९% मार्च २०२५ पर्यंत वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात मागील वर्षीच्या मार्च २०२४ मधील तुलनेत यंदाच्या मार्च तिमाहीत १५३.२२ कोटींवर वाढ झाली आहे. करोत्तर नफा मागील मार्च २०२४ तिमाहीतील ११.३१ कोटींच्या तुलनेत वाढत मार्च २०२५ मध्ये १६.९० कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाई) मागील वर्षाच्या मार्च २०२४ मधील २२.४३ कोटींच्या तुलनेत मार्च २०२५ पर्यंत वाढत ३०.०६ कोटीवर नफा गेला. सध्या कंपनीचे बाजार भांडवल २६४.५९ कोटी रुपये आहे. कंपनीच्या माहितीनुसार या आयपीओतील मिळालेल्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी (Capital Expenditure) साठी, खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirements), दैनंदिन कामकाजासाठी करणार आहे.
पहिल्या दिवशी कंपनीला किती सबस्क्रिप्शन मिळाले?
पहिल्या दिवशी कंपनीच्या आयपीओला १.१६ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे.
कंपनीला पहिल्या दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.२८ वेळा,पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४.४२ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.०९ वेळा सबस्क्रिप्शन मिळाले आहे.