'ग्रँड मास्टर' दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून गौरव होणार!

बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन


मुंबई: जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून 'ग्रँड मास्टर' किताब मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाच्या वतीने लवकरच सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.


अवघ्या १९ व्या वर्षी दिव्याने अंतिम फेरीत अनुभवी कोनेरू हम्पी यांना पराभूत करत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत तिने यशोशिखर गाठले असून, आतापर्यंत विविध स्पर्धांत २३ सुवर्ण पदकांसह एकूण सुमारे ३५ पदके पटकावली. दिव्याच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळाडूंनी घेतलेली झेप लक्षणीय आहे. दिव्या आणि कोनेरू हम्पी यांच्या चाली या तोडीस तोड होत्या आणि या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे. यातून भारताला आणखी एक ग्रँड मास्टर मिळाला असून तेही महाराष्ट्रातून हे विशेष अभिमानास्पद आहे. दिव्या आणि कोनेरू यांचे हे यश देशातील उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना प्रेरणा देणारे असून, भारताच्या क्रीडा लौकिकात मोलाची भर घालणारे आहे. दिव्याच्या सातत्यपूर्ण यशामागे असलेल्या तिच्या प्रशिक्षकांचे, मार्गदर्शकांचे तसेच कुटुंबीयांचे योगदानही मोठे आहे. ग्रँड मास्टर दिव्या देशमुख हिच्या या विश्वविजयी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री यांनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या असून, येणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही दिव्या असा विजय मिळवेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या