राज्यातील ग्रंथालयांना उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिला जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.


सन २०२३-२४ या वर्षासाठीचे हे पुरस्कार असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार शहरी विभागात चार आणि ग्रामीण विभागात तीन उत्कृष्ट ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारीनुसार जाहीर करण्यात आले आहेत. शहरीभागासाठी रोख रक्कम अनुक्रमे एक लाख ते २५ हजार रुपये, ग्रामीण भागासाठी ७५हजार ते २५ हजार अनुक्रमे आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.


डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार राज्यस्तरावर दोघांना पुरस्कार रक्कम ५०हजार आहेत. विभागस्तरावर पाच जणांना जाहीर झाले आहेत. तर डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार हे विभागस्तरावर सहा जणांना जाहीर झाले आहे. या सर्व पुरस्कारासाठी रोख २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे


उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार
शहरी विभाग :




  • सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, ता.कल्याण, जि.ठाणे

  • सर्वात्मक वाचनालय, बापू बंगला स्टॉप, इंदिरानगर, नाशिक

  • ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, वाघापूर, ता.जि.यवतमाळ

  • मा. शिल्पकार ल. ना. भालेराव सार्वजनिक वाचनालय, पंचवटी, नाशिक


ग्रामीण विभाग
१) स्व. समीर (तात्या) सोनटक्के वाचनालय, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव


२)बलराम सार्वजनिक वाचनालय, फुलउमरी, ता. मानोरा, जि. वाशिम


३) प्रगती सार्वजनिक वाचनालय, सिल्ली (आंबाडी) जि. भंडारा


डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार
राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)


१) श्री. धनंजय वसंतराव पवार, अध्यक्ष, श्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालय, हासाळा, पो. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर
राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)
१) श्रीमती श्रध्दा अशोक आमडेकर, ग्रंथपाल, श्री सदगुरु लोकमान्य वाचनालय देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी


विभागस्तरीय पुरस्कार
१) अमरावती: श्री. रामभाऊ पंढरी मुळे, सचिव, छत्रपती शाहू सार्वजनिक वाचनालय, मु. पो. हनुमान नगर, अकोला, ता.जि. अकोला.


२) छत्रपती संभाजीनगर: श्री. खंडेराव साहेबराव सरनाईक, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय, केंद्रा बु., ता. सेनगाव, जि. हिंगोली.


३) नाशिक: श्री. राहुलकुमार मालजी महिरे, अध्यक्ष, बौध्दवासी शांताई महिरे वाचनालय, आखाडे, मु.पो. आखाडे, ता. साक्री, जि.धुळे


४) पुणे: श्री. दत्तात्रय सखाराम देशपांडे, अध्यक्ष, ज्ञानदा मोफत वाचनालय, जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
५) मुंबई: श्री. सुभाष सीताराम कुळकर्णी, अध्यक्ष, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी, नवी मुंबई


डॉ. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार


१) अमरावती: श्री. अनंत श्रीराम सातव, ग्रंथपाल, सरस्वती वाचनालय, पातुर्डा बु., ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा


२) छत्रपती संभाजीनगर: श्री. सूर्यकांत कमलाकर जाधव, ग्रंथपाल, विवेकानंद वाचनालय, आलमला, ता. औसा, जि. लातूर


३)नागपुर: श्री. खेमचंद अंताराम डोंगरवार, ग्रंथपाल,श्रीमती सोनाबाई सितारामजी खुणे सार्वजनिक वाचनालय, नवेगाव / बांध, ता.अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया


४)नाशिक: श्री. चिंतामण संतोष उगलमुगले, ग्रंथपाल, ओंकार नगर सार्वजनिक वाचनालय, ओंकारनगर, पेठ रोड, ता.जि. नाशिक


५)पुणे: श्रीमती रुपाली यशवंत मुळे, ग्रंथपाल, श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, सातारा.


६)मुंबई: श्री. संजय काशिनाथ शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग


राज्यातील जनतेचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान लाभावे, यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, या ग्रंथालयांकडून राज्यातील जनतेला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शासनाकडून दरवर्षी हे पुरस्कार जाहीर करण्यात येत असतात अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

जालना : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांत जालन्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. ज्येष्ठ

Pune Mahapalika Result : पुणे महापालिका निकाल : एकत्र येऊनही काका पुतण्याचं नुकसान, भाजप आघाडीवर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने स्पष्ट आघाडी घेत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून

जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे.

Solapur election result : सोलापुरात काँग्रेसचा सुफडा साफ; खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रभागात भाजपचा दणदणीत विजय

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक