Accident : झारखंडमध्ये कावड यात्रेकरूंनी भरलेल्या बसला ट्रकने धडक दिली, १८ कावडियांचा मृत्यू

झारखंड: झारखंडमधील देवघरमध्ये मंगळवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. कावड यात्रेकरूंनी भरलेल्या एका बसला ट्रकने धडक दिल्याने १८ कावडियांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गोड्डा- देवघर राष्ट्रीय महामार्गावर झाला, ज्यामुळे परिसरात हाहाकार उडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोड्डा- देवघर राष्ट्रीय महामार्गावर, मोहनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात एका ट्रकने कावडिया यात्रेकरूंनी भरलेल्या बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत १८ यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. श्रावण महिन्यात देवघर येथे बाबा बैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने कावड यात्रेकरू येतात. हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा कावड यात्रेकरूंची मोठी गर्दी असते.

या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, कावड यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने