राज्यात २५ हजार प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळा मधील तब्बल २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्य शासनाने शाळांमधील संच मान्यता करण्यासाठी सुधारित शासन निर्णय १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित केला होता त्याचा हा परिणाम असल्यास सांगण्यात येत आहे.


छत्रपती संभाजीनगर आदर्श शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप ढाकणे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच ५१५ शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.



पूर्वीच्या संच मान्यतेनुसार, २० पटसंखेच्या शाळेत एकच शिक्षक आणि एक सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याची तरतूद होती. तसेच पूर्वी पहिली ते पाचवीच्या वर्गात ६१ विद्यार्थी असतील तर तीन शिक्षकांची तरतूद होती. मात्र, नव्या नियमात हा आकडा ७६ वर्गाला आहे. याच वेळी चौथा शिक्षक पूर्वी ९१ पट संख्येला देण्यात येत होता. आता १०६ वर पोहोचला आहे. नव्या नियमांनुसार, आता ७६ विद्यार्थ्यांना तीन शिक्षक आणि ९१ ऐवजी १०६ विद्यार्थ्यांना चौथा शिक्षक दिला जाणार आहे.या बदलांमुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरतील, असे ढाकणे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

कुंभपूर्व विकास कामांना गती; मंत्री गिरीश महाजन यांची अचानक पाहणी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्यात आली

सिंहस्थापूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर

राज्यात लॉकडाऊन अजिबात लागणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर, भोंदूबाबाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

नाशिक: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून

एसआयटीला अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय दिसलं?

मुंबई: अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून

श्रीरामपूरमध्ये राम नवमीदिवशी मिरवणुकीवर दगडफेक, १२ जणांवर गुन्हा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी