US China Talks: युरोपियन युनियनवर १५% कर लावल्यानंतर युएस चीन बोलणीला वेग मात्र...

  51

मोहित सोमण: युरोपियन युनियनशी १५% टेरिफ करार निश्चित केल्यावर जागतिक अर्थकारणात आणखी एक घडामोड घडत आहे ती म्हणजे युएस चीनच्या शिष्टमंडळांची आज स्टॉकहोम स्विडन येथे बैठक होईल असे सांगण्यात आले आहे. तशी माहिती आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिली आहे. युरोपियन युनियन व युएसमधील व्यापारी कराराचा तिढा सुटल्यानंतर आता युएसने चीनकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही मोठ्या अर्थव्यवस्थेत सुरु असलेल्या द्वंद्वाला पूर्णविराम देण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जागतिक बाजारपेठेत यापूर्वी चीन युएस यांनी आपल्या वस्तूवर निर्बंध लावून शीतयुद्धाचे संकेत दिले गेले होते.


माहितीनुसार, १२ ऑगस्टपर्यंत चीनला अमेरिकेने टेरिफच्या अतिरिक्त रेसिप्रोकल करारातून सूट दिली होती. मात्र ही मुदत संपत आल्यानंतर दोन्ही देशांच्या सरकारने द्विपक्षीय बोलणीला वेग दिल्याने यावर अंतिम निर्णय लवकरच लागू शकतो. याविषयी मे व जून महिन्यातही दोन्ही देशांची चर्चा सुरू होती मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. जर टेरिफवर अनिश्चितता कायम राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेत त्याचा नकारात्मक प्रभाव कायम राहू शकतो. मात्र जागतिक अर्थव्यवस्था तज्ञांच्या अंदाजानुसार टेरिफ सवलती तील मुदतीत आणखी वाढ होऊ शकते. त्यांच्या मते, हा तिढा इतका लवकर सुटण्याची शक्यता कमी आहे.


दोन्ही देशांच्या महत्वकांक्षेमुळे निर्णय निष्कर्षाप्रत येणे इतके सोपे नाही. मात्र बिजिंगचा वर्तमानपत्रात संबंधित 'दोन्ही देशांची बोलणी सुरू असल्याचे छापल्यानंतर युएस ट्रेझरी विभागाने यावर बोलण्याचे टाळले आहे. माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या ईयु - युएस टेरिफ कराराला मान्यता ट्रम्प यांनी दिल्याचे वृत्त काल उशीरा जाहीर झाले होते. यामध्ये दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित आहे. युरोपियन ब्लॉक देखील ७५० अब्ज डॉलर्स किमतीची अमेरिकन उर्जा खरेदी करेल आणि येत्या काही वर्षांत ६०० अ ब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्यांकनाची गुंतवणूक करणार आहे असे युरोपियन युनियनने सांगितले होते.


मात्र यू.एस.-चीन चर्चेत अशाच प्रकारच्या प्रगतीची अपेक्षा नाही परंतु व्यापार विश्लेषकांनी सांगितले की मे महिन्याच्या मध्यभागी झालेल्या दर आणि निर्यात नियंत्रण युद्धाचा आणखी ९० दिवस शीतयुद्ध कालावधीत आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यां च्या प्रशासनाने सेमीकंडक्टर,फार्मास्युटिकल्स, शिप-टू-शोर क्रेन आणि इतर चीनी उत्पादनांवर अतिरिक्त टेरिफ लावण्याची शक्यता दर्शविली होती. मात्र 'आम्ही चीनशी झालेल्या कराराच्या अगदी जवळ आहोत. आम्ही खरोखरच चीनशी करार केला, परंतु ते क से घडते हे आम्ही पाहू' असे ट्रम्प यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. आतापर्यंत, चर्चेत व्यापक आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष झाले नाही. त्यामध्ये अमेरिकेच्या तक्रारींचा समावेश आहे की चीनच्या राज्य-नेतृत्वाखालील, निर्यात-चालित (Export Oriented) मॉडेल स्वस्त वस्तूंनी जागतिक बाजारपेठेत पूर आणत आहे आणि तंत्रज्ञानाच्या वस्तूंवरील यू.एस. ची राष्ट्रीय सुरक्षा निर्यात नियंत्रणे चिनी वाढीस अडथळा आणण्यासाठी बीजिंगच्या तक्रारींचा समावेश आहे.


विश्लेषकांचे म्हणणे आहे की, यू.एस. चीन वाटाघाटी इतर आशियाई देशांपेक्षा खूपच जटिल आहेत आणि प्रस्तावित काळापेक्षा जास्त वेळ लागेल.लष्करी हार्डवेअरपासून कार विंडशील्ड वाइपर मोटर्सपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीमध्ये वापरल्या जाणार्‍या दुर्मिळ पृथ्वी ख निज आणि मॅग्नेटसाठी जागतिक बाजारपेठेतील चीनची पकड अमेरिकेच्या उद्योगांवरील एक प्रभावी लाभ ठरली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की आपण लवकरच चीनच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर निर्णय घेतील आणि दर आणि निर्यात नियंत्रणाची नवीन योजना ट्रम्प आखण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनकडूनही अनेक अमेरिकेत चीनी वस्तूंवर ५५% अतिरिक्त कर हटवण्यासाठी मागणी करू शकतो. त्यामुळे निर्यातीतील जटील मुद्यावर दोन्ही देशांच्या चर्चेला महत्व आहे ज्याचे पडसाद आशिया बाजारात आगामी का ला वधीत दिसून येतील.

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर

सिंधुदुर्गांतील भावी पिढीच्या भविष्यासाठी मंत्री नितेश राणे आक्रमक दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली