बारामती : एकाच कुटुंबातील चार जीव एकाच क्षणात हरपल्याने संपूर्ण बारामती हादरून गेली आहे. रस्ते अपघातात मुलगा आणि दोन नातींचा जागीच मृत्यू झाला आणि ही बातमी ऐकून काही तासांतच वडिलांनीही प्राण सोडले. एकाच कुटुंबातील ४ जणांनी जगाचा निरोप घेतल्याने गावात शोककळा पसरलीये. आज पहाटे आजोबांचे हृदयविकाराने निधन झाले. आपल्या मुलाचा आणि दोन नातीचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्का बसून आजोबा राजेंद्र आचार्य यांनी जीव सोडलाय. मुलगा वडील राजेंद्र आचार्य हे आजारी असल्याने त्यांना फळ आणण्यासाठी बाहेर गेला असता हा अपघात झाला.
पुणे : राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सुरु असलेल्या तुफान पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ...
डंपरने दुचाकीला दिली धडक
काल रविवारी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झाला होता. या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक दिली आणि यात दुचाकी डंपरच्या चाकाखाली गेल्याने तिघेही चिरडले गेले यात वडिल आणि दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुलाच्या आणि नातींच्या निधनाबद्दल कळताच आजोबांनी सोडले प्राण
या घटनेत ओंकार आचार्य, त्यांची चार वर्षाची मुलगी मधुरा आणि दहा वर्षाची मुलगी सई या दोघींचा मृत्यू झाला. घरातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मुलीचे आजोबा यांना समजली आणि याचा धक्का ७० वर्षीय आजोबाला बसला. आज पहाटे मयत मुलींचे आजोबा राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. घरातील चौघांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने बारामती आणि इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
फळ आणण्यासाठी गेले अन्...
राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते आणि मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर बारामतीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी नेण्यात आले. वडिलांना घरी आणल्यानंतर ओंकार आचार्य हे फळ आणण्यासाठी आपल्या दोन्ही मुलींना घेऊन मार्केटमध्ये गेले असता त्यांना डंपरने धडक दिली. राजेंद्र आचार्य हे अगोदरच आजारी होते आणि त्यामध्येच त्यांना मुलाचा आणि नातींचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना धक्का बसला आणि त्यांचे निधन झाले.